७०० रुपयात थार गाडी दिली तर माझे दिवाळेच निघेल!

आनंद महिंद्र यांनी एका लहान मुलाचा व्हीडिओ पाहून व्यक्त केली प्रतिक्रिया

७०० रुपयात थार गाडी दिली तर माझे दिवाळेच निघेल!

नोएडातील एका लहान मुलाला थार ही गाडी हवा असल्याचा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर शेअर केला आहे. तसेच असे केल्यास आमचे लवकरच दिवाळे निघेल, अशी फोटो ओळ दिली आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

नोएडातील चिकू यादव या मुलाचा हा व्हिडीओ आहे. तो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी २४ डिसेंबरला शेअर केला. या व्हिडीओ क्लिपमध्ये चीकू हा मुलगा त्याच्या वडिलांना ७०० रुपयांत थार ही गाडी घेण्यास सांगत आहे. या निष्पाप मुलाला असे वाटते आहे की, थार आणि एक्सयूव्ही ७०० गाडी एकच असून ती ७०० रुपयांना विकत घेता येऊ शकते. मुलगा आणि वडिलांच्या या प्रेमळ संवादांचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर शेअर केला आहे आणि त्यावर तितकीच प्रेमळ फोटोळ दिली आहे.

‘माझे मित्र सूनी तारापोरवाला यांनी मला हा व्हिडीओ पाठवला आहे आणि म्हटले आहे, ‘आय लव्ह चिकू’. हे पाहून मीदेखील इन्स्टावर त्याचे काही व्हिडीओ पाहिले आणि आता मलाही तो आवडू लागला आहे. माझी केवळ हीच अडचण आहे की, मी जर त्याचे ऐकले आणि थार ७०० रुपयांना विकली तर आम्हाला लवकरच दिवाळखोरी जाहीर करावी लागेल,’ असे महिंद्रा यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

अडवून ठेवलेले विमान ३०० प्रवाशांसह करणार उड्डाण!

हिजाब बंदी उठवायची की नाही; काँग्रेस सरकार गडबडले

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

तृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार

हा व्हिडीओ मूळ चिकूच्या इन्स्टाग्राम पेजवर आला आहे. जे पेज त्याचे वडील चालवतात. त्याच्या वडिलांनी हा व्हिडीओ जुलैमध्ये शेअर केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत सात लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. चिकूच्या या निष्पाप बोलण्यावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. तसेच, त्याचे शब्द खरे ठरावेत, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली आहे. ‘चिकूचे हे शब्द खरे ठरावेत.

मग मी देखील दोन गाड्या खरेदी करेन. एक माझ्यासाठी आणि दुसरी माझ्या बायकोसाठी,’ असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे. तर, दुसऱ्याने ‘चिकूचा चार्म पाकिटासाठी धोकादायक ठरू शकतो,’ असे नमूद केले आहे. ‘त्याचा क्युटनेस इतका भारी आहे की लोक दोन्ही गाड्या खरेदी करतील. त्याला थार आणि एक्सयूव्ही ७०० या दोन्ही गाड्यांचे ब्रँड अम्बेसेडर बनवण्याचा विचार करा,’ असे आणखी एकाने म्हटले आहे.

Exit mobile version