कोविड लस निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार

औषध शास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकांची घोषणा

कोविड लस निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा समजला जातो. २०२३ साठीचे शरीर विज्ञान किंवा औषध शास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कॅटलिन कारिको आणि ड्रिव वेईसमन यांना यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभावशाली mRNA कोविड लस निर्मितीमध्ये या शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे योगदान होते. यासाठी त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

करोना जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं होतं. यावेळी करोना विषाणूचा प्रतिकार करणारी लस निर्माण करण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. अशा संकटकाळात या दोन्ही वैज्ञानिकांनी mRNA आपल्या इम्युन सिस्टिमवर कसा प्रभाव टाकतो याचा अभ्यास केला. त्यांच्या या अभ्यासामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना लस निर्मिती शक्य झाली, असं नोबेलच्या समितीने घोषणा करताना सांगितले आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

आतापर्यंत १९०१ पासून शरीर विज्ञान किंवा औषध शास्त्रातील ११४ मान्यवरांना नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत. यात १३ महिलांना औषध शास्त्र विषयातील त्यांच्या अमुल्य कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. नोबेल पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. दरवर्षी हा पुरस्कर असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. नोबेल समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता. मानवजातीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ओषधशास्त्रातील वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला जातो.

Exit mobile version