इराणच्या तुरुंगात कैद असलेल्या नर्गिस मोहम्मदी नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी

महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढा आणि मानवाधिकारांसाठी काम

इराणच्या तुरुंगात कैद असलेल्या नर्गिस मोहम्मदी नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी

नोबेल पुरस्कार २०२३ ची घोषणा झाली असून यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना २०२३ चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्याची घोषणा करून नोबेल पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्कार २०२३ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३५१ उमेदवार होते, त्यापैकी २५९ व्यक्ती होत्या आणि ९२ संस्था होत्या. यावर्षी नोबेल पुरस्काराच्या मानांकनाच्या यादीत वकील कोहसार, अफगाण महिला कार्यकर्त्या मेहबूबा सेराज, नर्गेस मोहम्मदी फाऊंडेशन, इराणी हक्क प्रचारक नर्गिस मोहम्मदी यांची नावे समाविष्ट होती.

नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जाणारा हा शांतता पुरस्कार यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे.

गतवर्षी २०२२ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?

नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात १० वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या ३० वर्षात नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात उठवलेल्या आवाजानंतर सरकारने अनेकदा शिक्षा केली आहे.

Exit mobile version