27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!

एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.हे ८० वर्षीय वृद्ध पत्नीसोबत न्यूयॉर्कहून आले होते.एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये व्हीलचेअर पॅसेंजर म्हणून बूकिंग केले होते.मात्र, व्हीलचेअर पुरेशा नसल्याने वृद्ध दाम्पत्यासाठी फक्त एकच व्हीलचेअर मिळाली.तेव्हा त्या ८० वर्षीय वृद्धाने आपल्या पत्नीस व्हीलचेअरवर बसवून आपण चालत येण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ही व्यक्ती मुंबई विमानतळाच्या व्यक्ती इमिग्रेशन काउंटरवर पोहचली अन अचानक खाली कोसळली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

१२ फेब्रुवारीची ही घटना आहे.मूळचे भारतीय वंशाचे असलेले हे वृद्ध दाम्पत्य न्यूयॉर्कहून मुंबईला आले.त्यांनी मुंबईला येण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचे इकॉनॉमी क्लासचे बूकिंग केले होते.मुंबईतील विमानतळावर उतरल्यानंतर वृद्ध दाम्पत्यांनी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रूकडे व्हीलचेअरची विनंती केली.परंतु, विमानतळावर प्रचंड मागणीमुळे त्यांना फक्त एक व्हिलचेअर देण्यात आली.त्या व्हिलचेअर पत्नीस बसवून ८० वर्षीय वृद्धाने चालत येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.त्यांना विमानतळावरील वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि तेथून नानावटी रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

आईकडून ११वर्षीय मुलीची हत्या, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न!

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

या घटनेवर एअर इंडियाने स्पष्टीकरण देत म्हटले की, वृद्ध दाम्पत्याने व्हीलचेअर सेवेसाठी प्रीबुकिंग केले होते. रविवारी त्यांचे विमान न्यूयॉर्कहून निघाले होते. विमानात ३२ व्हीलचेअर प्रवासी होते पण मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी फक्त १५ व्हीलचेअर उपलब्ध होत्या. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले आहे की, व्हीलचेअरची प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली होती जेणेकरून व्हीलचेअरची व्यवस्था करता येईल.

मात्र, आपल्या पत्नीसोबत चालत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असे एअर इंडियाने सांगितले.ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे एअर इंडिया सांगितले.तसेच आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहोत, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा