29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेष१७ वर्षांत एकदाही विजेतेपद नाही

१७ वर्षांत एकदाही विजेतेपद नाही

बेंगळुरूचा विजेतेपदाचा दुष्काळ संपेना

Google News Follow

Related

आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे बेंगळुरूचे स्वप्न बुधवारी भंगले. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या उपांत्य सामन्यात राजस्थानने त्यांना पराभवाची धूळ चारली. राजस्थानने त्यांचा सहा विकेटने पराभव केला. बेंगळुरूने २० षटकांत आठ विकेट गमावून केवळ १७२ धावा केल्या. ही धावसंख्या मोदी स्टेडिअमवर तुलनेने कमी मानली जात आहे.
सन २०२२ मध्येही राजस्थानने बेंगळुरूला शर्यतीतून बाहेर फेकले होते. तर, सन २०२० आणि २०२१ मध्येही ते स्पर्धेत टिकू शकले नाहीत. बंगळुरूचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शेवटचा २०१६ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.

बंगळुरूकडे एबी डीव्हिलिअर्स, ख्रिस गेल आणि शेन वॉटसनसारख्या अव्वल फलंदाजांची फळी राहिली आहे. मात्र तरीही हा संघ विजेतेपदाला गवसणी घालू शकलेला नाही. आतापर्यंत बंगळुरूसह पंजाब आणि दिल्लीने एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावलेले नाही.

बेंगळुरूची आयपीएलमधील वाटचाल

  • २००८- गुणतक्त्यात सातव्या स्थानी
  • २००९ – उपविजेते
  • २०१० – लीगमध्ये तिसऱ्या स्थानी
  • २०११- उपविजेते
  • २०१२- लीगमध्ये पाचव्या स्थानी
  • २०१३- लीगमध्ये पाचव्या स्थानी
  • २०१४- लीगमध्ये सातव्या स्थानी
  • २०१५- प्लेऑफ्समध्ये बाद
  • २०१६- उपविजेते
  • २०१७ – लीगमध्ये आठव्या स्थानी
  • २०१८- लीगमध्ये सहाव्या स्थानी
  • २०१९- लीगमध्ये आठव्या स्थानी
  • २०२०- प्लेऑफ्समध्ये बाद
  • २०२१- प्लेऑफ्समध्ये बाद
  • २०२२ – प्लेऑफ्समध्ये बाद
  • २०२३- लीगमध्ये सहाव्या स्थानी
  • २०२४- प्लेऑफ्समध्ये बाद

हे ही वाचा:

बंगालमधील सन २०१० पासूनची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द

ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!

विराट कोहलीने या सामन्यात ३३ धावा केल्या तर, रजत पाटीदार याने ३४ धावा केल्या. मात्र ते बेंगळुरूला चांगले आव्हान देऊ शकतील, अशी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. राजस्थानच्या आर. अश्विन याने बेंगळुरूच्या फलंदाजांना रोखले. तर, दुसरीकडे राजस्थानच्या खेळाडूंनी शांतपणे खेळ केला. यशस्वी जयस्वाल, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांची खेळी महत्त्वाची ठरली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा