रेल्वे प्रवासासाठी तिकीट नाहीच, पासच घ्यावा लागणार!

रेल्वे प्रवासासाठी तिकीट नाहीच, पासच घ्यावा लागणार!

मुंबईमध्ये शाळा सुरु झाल्या परंतु लोकल मुभा नसल्यामुळे अनेकांना शाळा तसेच महाविद्यालयामध्ये जाता येत नव्हते. त्यामुळेच बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. आता मासिक पासच्या आधारे १८ वर्षांखालील मुलांना लोकल प्रवासाची मुभा मिळालेली आहे. पण तिकीट काढून अजूनही कुणाला प्रवास करता येणार नाही. हा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेला आहे.

मध्य रेल्वेकडून मध्य रात्री उशिरा घेतलेल्या निर्णयाचे पत्र शुक्रवारी व्हायरल झाले. परंतु यामध्ये ‘तिकीट’ असा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यामुळेच पुन्हा शुक्रवारी दुपारी व्हायरल पत्र ट्विट करत ‘तिकीट’ म्हणजे ‘मासिक पास’ वाचावे, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेकडून देण्यात आले होते.

राज्यामध्ये ४ तारखेपासून शाळा सुरु झाल्या. परंतु अनेक विद्यार्थ्यांना लांबून शाळा तसेच महाविद्यालय गाठावे लागते. अशांना मात्र काहीच सोय नव्हती. लोकलमुभा नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले होते. राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळेच आता रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर ओळखपत्र दाखवून मासिक पास उपलब्ध होणार आहे.

 

हे ही वाचा:

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

आता शहाण्यांनी ‘कोर्टाची’ पायरी चढायला हरकत नाही…

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

नवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर

 

मध्य रेल्वेने काढलेल्या आदेशात, ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या (लसधारक) व्याख्येत काही घटकांचा तातडीने समावेश करण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. तसेच १८ वर्षांखालील व्यक्तींला लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, या वर्गासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या ६० दिवसांपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी लस घेणे शक्य नसल्यास किंवा वैद्यकीय कारणांमुळे लस घेतली नसल्यास अशांना डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर मासिक पास घेऊन लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

Exit mobile version