विद्यार्थ्यांना तिकीट द्या…शेवटी मध्य रेल्वेनेच केली राज्य सरकारला विनंती

विद्यार्थ्यांना तिकीट द्या…शेवटी मध्य रेल्वेनेच केली राज्य सरकारला विनंती

राज्यामध्ये शाळा सुरु झाल्यात पण लोकल प्रवास मुभा नसल्याने, मुले शाळेत जाणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला शाळेसंदर्भातील कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तिकीट तसेच पास मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही आहे हे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळेच किमान राज्य सरकारने पत्र द्यावे, यासाठी आता मध्य रेल्वेनेच पुढाकार घेतलेला आहे. विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी तिकीट तसेच पासची मुभा देण्यात यावी, असे मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे.

सध्याच्या घडीला केवळ दोन लसीचे डोस झालेल्यांना लोकलप्रवास मुभा आहे. त्याचबरोबरीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करू शकतात. अजूनही लसीकरण म्हणावे तितके जलद नसल्यामुळे खूप नागरिक लोकलप्रवासासाठी वंचित राहिले आहेत. त्यातच अजून १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झाले नसल्यामुळे त्यांनाही प्रवास मुभा नाही. शिवाय पालकांसोबत प्रवास करताना मुलांना एकट्यांना कसे सोडायचे म्हणून पालक मुलांसोबत प्रवास करू लागले आहेत. परंतु मग तिकीट नसल्यामुळे या सर्वांनाच कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकल नसल्यामुळेच आता विद्यार्थ्यांना रस्तेमार्गे म्हणजेच खड्डेमार्गे प्रवास करावा लागत आहे.

 

हे ही वाचा:

ब्रिटनला शहाणपण आले; कोव्हिशिल्ड विलगीकरणाबद्दल घेतला हा निर्णय…

अफगाणिस्तानात शिया मशीद बॉम्बस्फोटात ५० बळी

लखीमपूर प्रकरण: हरीश साळवे मांडणार उत्तर प्रदेश सरकारची बाजू

स्कूलबसवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही!

 

अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि दोन लसमात्रा घेतलेले अशा एकूण ३८ लाखांहून अधिक प्रवाशांचा सध्याच्या घडीला लोकल प्रवास सुरु आहे. परंतु १८ वर्षाखालील मुले मुली मात्र प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. प्रवासी संघटनेतर्फे मुलांना व मुलींना प्रवासमुभा देण्यासाठी पत्र पाठवले आहे. लसमात्रा घेतलेल्या पालकांसोबत जातानाही या मुलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version