सांगा, आम्ही चालायचे तरी कसे?

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे?

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? प्रभादेवीतील नागुसयाजीच्या वाडीत चालताना स्थानिक रहिवाशांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील दुकानदारांनी आता दुकानाबरोबर बाहेरील फूटपाथ सोडाच अर्धा रस्ताही व्यापून टाकला आहे. रस्त्यावर दुकान थाटल्यामुळे रहिवाशी तसेच वाहन चालवतानाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथून ये-जा करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आम्ही चालायचे तरी कुठे? असा प्रश्न प्रभादेवीतील रहिवासी पालिका प्रशासनाला विचारत आहेत.

प्रभादेवी येथे सुशोभिकरणाचा ज्या ठिकाणी फलक लावला गेला आहे, कशासाठी तर सुंदर दिसण्यासाठी. या फलकाच्या समोरच फेरीवाल्यांनी दुकानाबाहेरील रस्त्यावर आपला पसारा मांडला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना यातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न स्थानिक विचारायला लागले आहेत.

आजही हे फेरीवाले रासरोसपणे बस्तान मांडून बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. येथे बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच रस्त्यावरच ठाण मांडलेले असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे त्रासदायक ठरते. गर्दीतून वाट काढत पुढे जावे लागते. हा रस्ता कधी मोकळा श्वास घेणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा :

मदरशात झाडूच्या सहाय्याने एके ४७ बनवण्याचे प्रशिक्षण!

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत समितीकडे १ कोटी सूचना

आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा

छे छे राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

या दुकानदारांनी फूटपाथबरोबर बाहेरील रस्ताही व्यापून टाकला आहे. आता हे रस्यावर धंदे लावू लागले आहेत. महापालिका आणि पोलिस यंत्रणा यावर कारवाई का करत नाही. एखाद्या मराठी व्यावसायिकाने असला प्रकार केला असता, तर त्यावर त्वरित कारवाई झाली असती. हे व्यावसायिक मराठी नसल्याने यावर कारवाई होत नाही का, असा प्रश्न प्रभादेवीतील रहिवासी राकेश उंबरळकर यांनी व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version