मॉल बाहेरूनच बघणाऱ्यांची संख्या वाढली

मॉल बाहेरूनच बघणाऱ्यांची संख्या वाढली

मुंबईत अखेर चार महिन्यांनी काही माॅल उघडले. परंतु म्हणावी तशी गर्दी मात्र दिसून आली नाही. त्यामुळे मॉलमधील दुकानदारांमध्ये नाराजी दिसली.

माॅलमध्ये दोन डोस झालेल्यांना परवानगी देण्याची अट असल्यामुळे माॅल लोकांविनाच उघडले होते. मुंबई ठाण्यातील अनेक माॅल त्यामुळेच गर्दीविना पाहायला मिळाले. शनिवार रविवार या दिवसामध्ये अनेकजण या ना त्या निमित्ताने बाहेर पडतात. खरेदी तसेच उपहारगृहांमध्ये जातात, परंतु माॅल मध्ये मात्र अजिबात गर्दी दिसून आली नाही. अनेकांना माॅलच्या दरवाज्यावरून परत जावे लागले होते. दुसरा लसीचा डोस न घेतलेल्यांना माॅलमध्ये परवानगी नव्हती.

चार महिन्यांत प्रथमच शटर उघडल्यामुळे दुकानदार खुश होते. परंतु मॉल्समध्ये गर्दी नसल्याने दुकानदारांचा भ्रमनिरास झाला होता. तसेच आता रेस्टॉरंट्ससाठी सुद्धा वाढीव वेळ देण्यात आल्यामुळे ते चालक मालकही खुश होते. तरीही माॅलमधील उपहारगृहे मात्र ओस पडली होती. संध्याकाळपर्यंत गर्दी नसल्याने अनेकांना आपली दुकाने बंद करावी लागली. मुख्य म्हणजे शनिवार व रविवार असल्याकारणाने गर्दी होईल असे वाटत होते. मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये सहसा वीकएंडला जास्त गर्दी दिसून येते. लसीकरणाच्या प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी अनेक ठिकाणी होत नव्हती. तरीही खूप कमी ग्राहक माॅलमध्ये आढळले.

हे ही वाचा:

ओबीसी आरक्षणावर शरद पवारांची टोलवाटोलवी सुरूच

प्रवीण गायकवाडना लायकीत राहण्याचा इशारा! या पक्षाने दिला दम

काबुल विमानतळ बंद

ठाण्यात गायब होताहेत मोबाईल आणि गाड्या

लसीकरणावरील निर्बंधांमुळे माॅलकडे अनेक ग्राहक वळलेच नाहीत. पहिल्या लाटेनंतर मॉल उघडे असताना ग्राहकांनी मात्र फारशी गर्दी केली नव्हती. त्यामुळे माॅलकरता कधी नियम शिथिल केला जाईल याकडे माॅलचालक आता डोळे लावून बसले आहेत. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाऊ शकते. हा नियम माॅल प्रवेशद्वारावर अनेकांनी वाचला आणि तिथूनच अनेकांना परत जावे लागले होते. दोन्ही डोस नंतरही अनेकांना संसर्ग झाला आहे, मग का उगाच नको त्या जाचक अटी, असा प्रश्न आता अनेक ग्राहकांना पडलेला आहे.

Exit mobile version