विराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत

विराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या चर्चांना विराट कोहली याने पत्रकार परिषदेत बोलताना पूर्णविराम दिला आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना विराट याने स्पष्ट केले की त्याच्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणतेही वाद किंवा मतभेद नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याचे उत्तर तेच आहे की कोणतेही वाद नाहीत.

रोहित शिवाय भारतीय संघ अधूरा असून तो भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे, अशा आशयाचे विराट कोहलीने वक्तव्य केले आहे. रोहित हा एक चांगला कर्णधार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड हे संघासाठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आपला पाठींबा असेल, असे विराट कोहलीने म्हटले.

पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या मालिकेत खेळण्यास मी तयार आहे. विश्रांतीसाठी मी बीसीसीआयकडे वेळ मागितला नाही. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत, असे मत विराट कोहली याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही?’

मुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

पॅरालिम्पिक विजेत्या भाविना पटेलला मिळाली ही चकचकीत गाडी

कॅप्टन्सी गेल्यानंतर माझ्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होणार नाही. ज्यावेळी मी मैदानात उतरतो त्यावेळी टीम इंडियासाठी जे करायला पाहिजे ते सर्व करण्यावर भर देतो. यापूर्वी वनडेत जसे योगदान दिले तसेच योगदन कर्गणधार पद गमावल्यानंतरही देत राहीन.

भारतीय टी- २० संघाचे नेतृत्व सोडण्यासंदर्भात बीसीसीआयसोबत चर्चा केली होती. यावेळी बीसीसीआयने माझ्या निर्णयाला सहमती दिली. नेतृत्व सोडू नये, असा कोणताही सल्ला बीसीसीआयकून मिळाला नाही. वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व कायम करेन, असे बोलणे झाले होते आणि त्यावर निवड समितीला हे मान्य नसल्यास त्यांचा निर्णय मान्य असल्याचेही सांगितले होते असे कोहलीने म्हटले आहे.

Exit mobile version