25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेष‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’

‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’

फिरकीपटू अश्विन रवीचंद्रन याने कथन केली परिस्थिती

Google News Follow

Related

‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू अश्विन रवीचंद्रन यालाही बसला आहे. त्याच्या भागात गेले ३० तास वीजच नसल्याचे त्याने सांगितले आहे.

मिचाँग चक्रीवादळाचा फटका बसल्याने चेन्नईवासींचे हाल होत आहेत. या परिस्थितीचे वर्णन करताना अश्विन रवीचंद्रन यानेही केले आहे. ‘गेल्या ३० तासांपासून माझ्या परिसरातील वीजपुरवठा बंद आहे. मला वाटते, हीच परिस्थिती अन्य ठिकाणीही असावी. माहीत नाही, आपल्यासमोर काय पर्याय आहेत,’ अशी पोस्ट अश्विन रवीचंद्रन याने ‘एक्स’वर केली आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईतून ४८ तासांत सहा मुले बेपत्ता

लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख अदनान अहमदची कराचीमध्ये हत्या!

नवं सिम घेण्यासाठी डिजिटल केवायसी अनिर्वाय

१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी

चेन्नईतील एक रहिवाशाने ग्रँड मॉलजवळ वीजपुरवठा नसल्याची तक्रार ‘एक्स’वर केली होती. ते अश्विनने रीपोस्ट केली. याआधीही अश्विनने चेन्नईतील पुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आततायीपणा न करण्याचा सल्ला दिला होता. ‘जरी पाऊस थांबला असला तरी परिस्थिती पूर्ववत होण्यास थोडा वेळ जाईल,’ असे आवाहन त्याने केले होते.

पाऊसबळींची संख्या १२
चेन्नई शहर आणि परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२ झाली आहे. तर, ११ जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव पथकांतील कर्मचारी मंगळवारी मासेमारी बोटी आणि शेतातील ट्रॅक्टर यांचा वापर करून अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा