30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषलसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच

लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहीहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली आहे. दहीहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहीदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही.

गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत तर काही आश्वासनं ही दिली आहेत. “आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना.”

हे ही वाचा:

जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय

महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी

ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

“आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा