रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?

रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?

अंदमानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेची १०० वर्षे झाली. त्यानिमित्ताने सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख रणजित सावरकर यांच्याशी न्यूज डंकाच्या प्रतिनिधीने बातचीत केली. त्यावेळी रणजित सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना रणजित सावरकर यांनी सावरकरांच्या तथाकथित माफिनाम्याविषयी परखड मत व्यक्त केले. मर्सी पिटिशन या नावामुळे काही लोकांनी निष्कारणच हा वाद निर्माण केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अन्यथा ही एक न्यायिक प्रक्रिया होती, जी अनेक नेत्यांनी स्वीकारली होती असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सावरकर हे अतिशय धोकादायक बंदीवान असं तुरूंगाधिकारी म्हणतो. इतर क्रांतिकारक ६ महिन्यांच्या तुरुंगवासांनंतर नंतर बेटावरच परंतु तुरूंगाच्या बाहेर असत. सावरकर मात्र ११ वर्ष तुरूंगातच होते असे त्यांनी सांगितले. सर्वाधिक ११ वर्ष कैदेत असलेला एकमेव कैदी असल्याचेही ते म्हणाले. त्याबरोबरच त्यांनी सावरकरांच्या अंदमान आणि रत्नागिरी कोठडीबाबत देखील सविस्तर माहिती दिली.

हे ही वाचा:

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

जल्दी लगा दे सुई…

भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस

स्पुतनिक-वी भारतात दाखल

सावरकरांच्या एकूण क्रांतिकार्याचा आढावा घेताना त्यांनी अंदमानपुर्व काळातील कार्याबद्दल देखील सांगितले. सावरकरांनी १९०७ मध्ये लिहीलेल्या एका लेखाचा हवाला देत त्यांनी सर्व क्रांतिकारकांनी पहिल्या महायुद्धात करायच्या मोठ्या उठावाच्या कटाबद्द देखील सांगितले. त्याबरोबरच एकूण क्रांतिकार्य कसा बदल झाला आणि तुर्कस्थान युद्धात उतरल्यानंतर क्रांतिकार्याला आलेल्या धार्मिक रंगाबद्दल देखील सांगितले. सावरकरांनी हा धार्मिक धोका आधिच ओळखला असल्याचे देखील ते म्हणाले. याबद्दल त्यांनी या मुलाखतीत सविस्तर सांगितले.

सावकरांचे सैनिकीकरणाबाबतचे धोरण देखील त्यांनी यावेळी सविस्तर उलगडले. सैनिकीकरणावर टीका करणाऱ्यांना या मुलाखतीतून रणजित सावरकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. घरातले कर्ते पुरूष तुरूंगात गेल्यानंतर घरच्या महिलांनी घर कसे सांभाळले या बाबत देखील त्यांनी चर्चा केली.

सावरकरांनी अंदमानचा कायापालट केला. बंदिवानांचं निवासस्थान तिर्थक्षेत्र कशामुळे झालं? सावकरांनी अंदमानच्या तुरूंगातही समाजसुधारणा कशी केली याबाबत माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी इतिहास पुन्हा एकदा घडत असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे एकवेळ सावरकरांना, त्यांच्या त्यागाला विसरा, कृतघ्न व्हा पण सावरकरांचे विचार विसरू नका अशी कळकळीची विनंती देखील त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version