आता पर्यटनासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही?

आता पर्यटनासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही?

देशातील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशा वेळेस देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नसावी अशी सूचना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

देशातील कोरोना आटोक्यात येत असल्याने केंद्रासह अनेक राज्यांनी निर्बंधात शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देशांतर्गत प्रवास करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करु नये, असं मंत्रालयाकडून राज्यांना सांगण्यात आलं आहे. मंत्रालयाने बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिलं असून देशभरात एकच प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

बस उत्पादकांना लसीकरणानंतर तेजीची आशा

धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

शिक्षणाधिकाऱ्यांकडील मालमत्ता पाहून पोलिसही हबकले

काही राज्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना देखील आरटीपीसीआर चाचणीशिवाय राज्यात प्रवेश करु देत आहेत. पण, काही राज्यांनी प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असले तरी आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे. पश्चिम बंगालने मुंबई, पुणे, चेन्नई, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही लस घेतल्या असल्या तरी आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास सांगितलं आहे. सर्व राज्यांना एकच प्रोटोकॉलचे अनुकरण करण्याचे मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यास बांधिल करु नये, असं सुचवलं आहे. पर्यटन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित संघटनांशी मंत्रालयाने ५ ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. यावेळी नियम शिथिल करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काही राज्यांनी देशभरातून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी या राज्यांमध्ये आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे बंधनकारक ठेवले नसून, पर्यंटकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. यासंदर्भात आरोग्य आणि नागरी उड्डाण मंत्रालयासोबत यासंदर्भात बैठक बोलावली जाणार असून एकत्र प्रोटोकॉल कसा राबवला जाईल याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे देखील समजले आहे.

Exit mobile version