मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःची वास्तू असणे हे एक स्वप्न असते. त्यामुळेच म्हाडाकडे अनेक मध्यमवर्गीयांचा ओढा दिसून येतो. म्हाडाच्या माध्यमातून घरखरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये म्हाडाच्या घरांच्या सोडती न निघाल्यामुळे अनेकजण निराश झालेले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत घरे उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आलेले आहे. त्यामुळेच आता सर्वसामान्यांची वास्तूसाठी प्रतीक्षा अधिक काळ वाढणार आहे.
एकीकडे ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे अनेक बंगले बांधण्याचे काम सुरू आहे. काही राजकीय नेत्यांवर अनधिकृत बंगले बांधल्याचे आरोप होत आहेत. तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना मात्र साधे म्हाडाच्या माध्यमातून घर उपलब्ध होत नाही ही शोकांतिकाच आहे.
हे ही वाचा:
पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!
पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने
ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा
रिक्त पदांच्या प्रश्नावर राज्य अधिकारी महासंघ संपाच्या तयारीत
मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाकडून याआधी सोडतीमध्ये विजेत्यांनी ताबा न घेतलेल्या घरांचा समावेश होतो. परंतु आता तब्बल दोन वर्षे सोडत निघाली नसल्याकारणाने मध्यमवर्गीय हक्काच्या घराच्या स्वप्नापासून वंचित राहिलेला आहे. दोन वर्षांनी सोडत न निघाल्याने अनेकांच्या निराशा झालेल्या आहेत. म्हाडाच्या माध्यमातून अल्प मध्यम गटांनाही अनेक ठिकाणी चांगली घरे मिळालेली आहेत. म्हाडाच्या सोडतीकडे सामान्य मुंबईकर हा कायम डोळे लावून बसलेला असतो. परंतु सर्वसामान्यांच्या कुठल्याही मुद्द्यावर ठाकरे सरकार सजग नाही हेच आता दिसून येत आहे.
यासंदर्भात मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे म्हणतात की, घरांच्या संख्येअभावी यंदा सोडत काढणे शक्य नाही. पण आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील वर्षी सोडतीत गोरेगावमधील घरे असतील.