दिवाळीसणा निमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नेहमीच्या वेळापत्रकानुसार रविवार असल्यामुळे लोकलच्या नियमित फेऱ्यांपेक्षा कमी लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच दिवाळी निमित्त लोकल गाड्यांमध्ये जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने या दिवशी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनेने घेतला आहे.
दरवेळी रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमध्ये ओव्हरहेड वायर, सिंग्नल यंत्रणा, रूळ आदी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर घेण्यात येतो. तसेच उद्या कमी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून, काही फेऱ्या रद्द होऊ शकतात. दिवाळी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची रेल्वेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्यरेल्वेकडून घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
मात्र पश्चिम रेल्वेकडून ही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे रविवारच वेळापत्र लागू करणार आहे. मात्र या दिवशी नेहमी पेक्षा कमी लोकल फेऱ्या होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पश्चिम रेल्वेने रविवारच्या फेऱ्या लोकल व्यक्तिरिक्त आणखी कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र दरदिवशी मध्य रेल्वेवर १ हजार ८१० फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी रविवारी सुमारे १ हजार ४०० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत, तर पश्चिम रेल्वेच्या दररोज १ हजार ३८३ फेऱ्या चालवल्या जातात तर रविवारच्या दिवशी लोकल फेऱ्या कमी होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांना गर्दीतून प्रवास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दिवाळीमुळे २३ ऑक्टोबरला मेगा ब्लॉक नाही