तुम्हाला हे माहितेय का? यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. पण हे खरे आहे. जगात असे दोन देश आहेत, जिथे एकही मशिद नाही. या दोन्ही देशांत अनेक वर्षांपासून मशिद बांधण्याची मागणी होत आहे. परंतु शासनाची त्यास परवानगी मिळत नाहीए. योगायोगाने हे दोन्हीही देश नवीन आहेत. एक स्लोव्हाकिया, जो चेकोस्लोव्हाकियापासून वेगळा होऊन निर्माण झाला आणि दुसरा देश म्हणजे एस्टोनिया. या देशात राहणाऱ्या मुस्लिमांची संख्याही खूपच कमी आहे. हे मुस्लिम त्यांच्या घरात किंवा संस्कृती केंद्रात नमाज अदा करतात.
एस्टोनियामध्ये मुस्लिम लोकसंख्या खूपच कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, तेथे १५०८ मुस्लिम राहत होते. म्हणजेच तेथील लोकसंख्येच्या फक्त ०.१४ टक्के. तो आत्तापर्यंत वाढलाही असेल. तरीही या देशात मशिद नाही. एका इस्लामिक संस्कृती केंद्रात मुस्लिम नमाज अदा करण्यासाठी जमतात. सुन्नी टाटर आणि शिया अझरी मुस्लिम येथे राहतात. ज्यांनी एकेकाळी रशियन सैन्यात सेवा केली होती. एस्टोनियामध्ये काही ठिकाणी लोक प्रार्थनेसाठी एखाद्या फ्लॅटमध्ये जमतात. तेथे सुन्नी आणि शिया एकत्र नमाज अदा करतात.
स्लोवाकियामध्ये किती मुस्लिम?
स्लोव्हाकियामध्ये २०१० मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ५००० च्या आसपास होती. ते देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ०.१ टक्के होते. सतराव्या शतकाच्या आसपास येथे आलेले मुस्लिम तुर्क आणि उईघुर होते. जे स्लोव्हाकियाच्या मध्य आणि दक्षिण भागात स्थायिक झाले. एकेकाळी या देशाला युगोस्लाव्हिया म्हटले जायचे. त्यानंतर ते तुटल्यावर स्लोव्हाकिया हा वेगळा देश झाला. युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या बोस्निया आणि अल्बेनिया या इतर देशांमधून निर्वासित म्हणून अनेक मुस्लिम देखील येथे दाखल झाले. येथील राजधानी ब्रातिस्लाव्हा आहे. आशियाई देशांतील इतर मुस्लिमही येथे राहतात.
मशिदीवरून वाद सुरू आहे
स्लोव्हाकिया युरोपियन युनियनचा सदस्य आहे, परंतु तो शेवटचा सदस्य बनलेला देश आहे. इथेही मशिद नाही. यावरून वादही निर्माण झाला. सन २००० मध्ये स्लोव्हाकियाच्या राजधानीत इस्लामिक केंद्राच्या स्थापनेवरून बराच वाद झाला होता.
म्हणूनच मुस्लिम निर्वासितांना परवानगी नव्हती
२०१५ मध्ये जेव्हा निर्वासित स्थलांतर हा युरोपसमोर मोठा मुद्दा बनला. तेव्हा स्लोव्हाकियाने २०० ख्रिश्चनांना आश्रय दिला. परंतु मुस्लिमांना आश्रय देण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर स्लोव्हाकियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले की, येथे मुस्लिमांसाठी कोणतेही प्रार्थनास्थळ नाही आणि अशा परिस्थितीत मुस्लिमांना आश्रय दिल्यास देशात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, त्यांच्या या निर्णयावर युरोपीय संघानेही टीका केली होती.
हे ही वाचा:
‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संपातले
पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!
शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी
‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर
इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जाही नाही
३० नोव्हेंबर २०१६ रोजी स्लोव्हाकियाने इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देण्यास मनाई करणारा कायदा पारित केला, याचा अर्थ स्लोव्हाकियामध्ये इस्लाम धर्म म्हणून स्वीकारला जाणार नाही, हा संदेश होता.
एक अनधिकृत इस्लामिक केंद्र आहे
तथापि, राजधानी ब्रातिस्लाव्हाच्या बाहेर कॉर्डोबामध्ये इस्लामिक केंद्र आहे, जेथे मुस्लिम प्रार्थना करतात. संपूर्ण देशात हे एकमेव ठिकाण आहे, जिथे मुस्लिम येतात आणि नमाज अदा करतात. पण ही अनधिकृत मशिद आहे. या इमारतीत मस्जिदीची पारंपरिक सजावट करण्याची परवानगी नाही. स्लोव्हाकियाच्या मुस्लिमांनी तिला अधिकृत मशिदीचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु प्रत्येक सरकारने त्यांची विनंती फेटाळली आहे.
प्रत्येकाने आपले ओळखपत्र नेहमी जवळ बाळगावे
स्लोव्हाकियामध्ये काही नियम आणि कायदे नेहमीच पाळले जातात. उदाहरणार्थ, इथे प्रत्येकाला त्याचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागते. जर तुम्ही स्लोव्हाकियाला भेट देण्यासाठी गेला असाल तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट नेहमी जवळ ठेवावा लागतो.
येथे आवाज करण्यास मनाई आहे
स्लोव्हाकियामध्ये ध्वनी प्रदूषणाचा कडक कायदा आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुम्हाला शिस्तीचे पाळण करावे लागते. कोणाशीही तुम्ही गोंधळ आणि गैरवर्तन करू शकत नाही. अन्यथा पोलिस तुम्हाला अटक करू करून मोठा दंडही करी शकतात.