आयपीएलच्या १४ व्या मोसमाची सलामीची लढत अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यातच ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्टेडियमधील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासलं असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने खेळणं कितपत सुरक्षित आहेत, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
वानखेडे स्टेडियमवर पुन्हा काही कर्मचार्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. ताज्या माहितीनुसार, वानखेडेमध्ये आणखी ३ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन ग्राऊंड्समन आणि एका प्लंबरचा समावेश आहे. वानखेडे स्टेडियमवरील कोरोना संसर्गाची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यात, याच स्टेडियमचे ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, सोमवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होतोय. त्यामुळे राज्यात आयपीएलच्या आयोजनावर संकट निर्माण झालंय. मुंबईत उपस्थित काही खेळाडूंव्यतिरिक्त, ग्राउंड्समन ते टूर्नामेंट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सपर्यंतच्या काही कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा बीसीसीआयची चिंता वाढविली आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?
बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से
भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे
सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास
स्टेडियममध्ये तीन नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, “तपासणीत दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामधले दोन मैदानातील कर्मचारी आहेत. दुसरीकडे एमसीए किंवा बीसीसीआयकडून या संदर्भात अजून कोणतीही माहिती किंवा कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.