बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

बेस्ट भाडेवाढ टळली; पण तोटावाढ सुरूच!

बेस्टने नुकताच त्यांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पांतर्गत बेस्टला २,२३६ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्य म्हणजे सध्यातरी बेस्टची भाडेवाढ टळली आहे, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. नुकताच बेस्टकडून २०२२-२३ या वर्षाचा २,२३६ कोटी ४८ लाख रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प अंदाज सादर केला. याअंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत बेस्टच्या तोट्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाचा तोटा २,११० कोटी ४७ लाख रुपये आणि वीज विभागाचा तोटा १२६ कोटी ०१ लाख रुपये आहे असे अर्थसंकल्पामध्ये म्हटले आहे.

मुख्य म्हणजे मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार बेस्ट ही तोट्यात आहे हे सिद्ध झालेले आहे. परंतु सध्या तरी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार नाही. गतवर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदा तुटीमध्ये ३४९ कोटी ४८ लाख रुपयांची वाढ झालेली आहे.

बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद यांनी हा अर्थसंकल्प बैठकीत सादर केला. यानुसार गतवर्षी १,८८७ कोटी रुपये तोटा झालेला होता. यामध्ये परिवहन विभागाचे उत्पन्न १,४५१ कोटी ६७ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. तर खर्च मात्र ३,५६२ कोटी १४ लाख रुपये इतका झालेला आहे. त्यामुळेच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ पाहता बेस्टची बिकट अवस्था लक्षात येत आहे.

 

हे ही वाचा:

कोळीवाडे, गावठाण, जीर्ण इमारतींच्या विकासाला हिरवा कंदिल

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

 

यामध्ये वीजपुरवठ्याचे उत्पन्न ३,५४५ कोटी ३७ लाख रुपये असून ३,६७१ कोटी ३८ लाख रुपये खर्च आहे. सध्याच्या घडीला वातानुकूलित विजेवरील बसचा (ई-बस) ताफा वाढवण्याचा निर्णय बेस्टने घेतलेला आहे. यामध्ये तब्बल २,१०० वातानुकूलित ई-बस मार्च २०२३ पर्यंत दाखल होणार आहे. या सर्व बसेस टप्प्याटप्यात दाखल होतील अशी माहिती अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी देण्यात आली.

Exit mobile version