मुंबईत प्रत्येक बुधवारी ‘नो हॉकिंग डे’

मुंबईत प्रत्येक बुधवारी ‘नो हॉकिंग डे’

मुंबईला एक दिवस हॉर्न ध्वनी प्रदूषनातून मुक्त करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रत्येक बुधवारी ‘नो हॉंकिंग डे’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण हॉर्न वाजविणार्या वाहन चालकावर चलनची कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांकडून प्रत्येक बुधवारी दिवसभर मुंबईत ‘नो हॉकिंग डे’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिक ,विद्यार्थी, रुग्ण,स्थानिक नागरिक यांना होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाच्या त्रासाबद्दल मुंबई वाहतूक पोलीस शाखेकडून एक दिवसासाठी ही विशेष मोहीम राबीवली जाणार आहे.

मुंबईतील सर्व वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी हे त्यांच्या हद्दीतील प्रत्येक बुधवारी पुर्ण दिवस ‘नो हॉकिंग डे’ चे आयोजन करतील. त्यामध्ये नो हॉकिंगचे फलक, बॅनर बनवून सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांना दाखविण्यात येतील. त्याचबरोबर नो हॉकिंगबाबत मेघा माईकवरून वाहन चालकांचे मार्गदर्शन व समुपदेशन करतील.

हे ही वाचा:

तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा

‘ आम्हाला रोखण्यासाठी आजोबा आणि नातवाचा प्रशासनावर दबाव’

वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कायद्याची जरब असावी याकरीता नो हॉकिंग या वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या जास्तीत जास्त वाहन चालकांवर चलन कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आलेले आहे.

Exit mobile version