व्वा रे व्वा! गरब्याला नियमांच्या साखळ्या घालून विचारांचे सोने मात्र लुटणार

व्वा रे व्वा! गरब्याला नियमांच्या साखळ्या घालून विचारांचे सोने मात्र लुटणार

राज्यामध्ये हिंदूच्या सणांवर निर्बंधांचा फेरा सुरूच आहे. राज्यामध्ये आजपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने गरबा खेळण्याची प्रथा ही फार पूर्वापार चालत आलेली आहे. परंतु कोरोनाच्या निर्बंधांच्या नावाखाली ठाकरे सरकारने गरबा खेळण्यावर बंदी घातलेली आहे. परंतु असे असले तरी, दुसरीकडे शिवसेना आपल्या दसरा मेळाव्याची तयारी मात्र अगदी जोरात करत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सोशल मीडीयावर चांगलीच टिकेची झोड उठत आहे.

ठाकरे सरकार, ज्याने कोरोना महामारीच्या नावाखाली महाराष्ट्रात नवरात्रीदरम्यान गरबा -दांडियावर बंदी घातली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शनाची एक नामी संधी असते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, यंदा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही तर कोरोना नियमांचे पालन करून थेट रॅली काढली जाईल.

राऊत यांच्या या मुद्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले की, नवरात्रीच्या नऊ दिवसानंतरच दसरा येतो. जर नवरात्रीमध्ये गरबा-दांडियाद्वारे कोरोना पसरेल, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून कोरोना पसरू शकत नाही का. रॅलीत लाखो लोक जमतील असे प्रश्नच आता सोशल माध्यमांवर लोक थेट विचारू लागले आहेत.

 

हे ही वाचा:

वस्त्रोद्योग व्यवसायासाठी मोदी सरकारची मोठी योजना

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपाच नंबर १

मुल्ला बरादर-हक्कानी नेटवर्क संघर्ष उघड

‘राहुल गांधी प्रत्येक मुद्द्याचे फक्त राजकीय भांडवल करतात’

 

त्यामुळेच आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोशल मीडीया चांगलाच पेटून उठलाय. गतवर्षी हाच मेळावा ऑनलाइन आयोजित केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, पक्ष दक्षिण-मध्य मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसरा मेळावा आयोजित करतो. परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे मेळावा होऊ शकला नाही. ते म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दसरा मेळावा आयोजित केला जाईल आणि पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुका पाहता हे अत्यंत महत्त्वाचे असेल.

Exit mobile version