कोरोनाच्या निर्बंध जाचात गणेश मंडळे चांगलीच आर्थिक कोंडीत सापडली आहेत. याच धर्तीवर मंडळांचे मंडपशुल्क माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण शहरात आता अशा मागणीने जोर धरला असून या निर्बंधाला कंटाळून कल्याण डोंबिवली येथील मंडळांनी मंडप शुल्क न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. याकरता गणेशोत्सव समन्वय संस्थेने पालिका प्रशासनाकडे शुल्कमाफीची मागणी केली आहे.
अद्याप यावर पालिकेने कोणताही निर्णय मात्र दिलेला नाही. पालिकेने निर्णय न दिल्यास मंडळांनी शुल्क न भरण्याचा पवित्रा आता घेतलेला आहे. अवघ्या काही दिवसांवर आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. असे असतानांही कल्याण डोंबिवली महापालिकेने निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळेच आता मंडळं त्रस्त झालेली आहेत. सध्याच्या घडीला कोरोना निर्बंधांमुळे समाजातील अनेक घटकांचे चांगलेच नुकसान झालेले आहे.
निर्बंधजाचामुळे गणेशोत्सव मंडळांना जाहिरातींच्या माध्यमातूनही पैसा मिळत नाहीये. त्यामुळेच मंडळापुढे खर्च कसा करायचा हा प्रश्न आ वासून उभा आहे. त्याचबरोबरीने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंधामुळे मूर्तिकार आर्थिक संकटात सापडलेला आहे. सध्याच्या घडीला गणेशोत्सव मंडळं संकटात असल्याने मंडळांचे मंडपशुल्क माफ करून ठाणे व मुंबई पालिकेने मंडळांना दिलासा दिलेला आहे. परंतु अजूनही कल्याण डोंबिवलीतील मंडप शुल्कमाफीवर काहीच निर्णय झालेला नाही. ठाणे तसेच मुंबईमध्ये मंडप शुल्काच्या बाबतीत दिलासा मिळालेला आहे. पण कल्याण डोंबिवली महापालिका मात्र अजूनही काहीच निर्णय देत नसल्यामुळेच आता मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हे ही वाचा:
नाटकाचा पडदा उघडण्यासाठी रंगकर्मी करणार नटराजाची आरती
अनिल परब…जरा स्वतःच्या खात्याकडे लक्ष द्या
काँग्रेसच्या नसीम खान यांनी लांडेंविरोधात केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरेंचाही उल्लेख
भारताचे धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव
मंडप शुल्क आकारू नये अशी मागणी ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच गणेशोत्सव समन्वय संस्थेने केली होती. यामध्ये महापालिका तसेच अग्निशमन दलाकडून स्वीकारण्यात येणारे शुल्क माफ करावे अशी मागणी केलेली होती.