विश्वातील कोणतीही शक्ती ३७० कलम परत आणू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर निशाणा

विश्वातील कोणतीही शक्ती ३७० कलम परत आणू शकत नाही

आता विश्वातील कोणतीही शक्ती कलम ३७० परत आणू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका देशात दोन संविधान चालणार नाही. कलम ३७० हटवणे हा राजकीय विषय नसून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील लोकांसाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा..

गाडीखाली चिरडलेली तरुणी म्हणते, ‘मी प्रेमात होते, तो विवाहित असल्याचे माहीत नव्हते’

बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!

भयानक!! दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेची साडी मेट्रोत अडकली आणि…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ३७० कलम हटवण्याचा निर्णय योग्य होता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका देशात दोन संविधान असू शकत नाहीत. कोणत्याही राजकारणापेक्षा हा निर्णय घेणे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांसाठी महत्वाचा होता. यातून तिथल्या सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधत म्हणाले, काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ते ताब्यात घेतले होते. जम्मू-काश्मीरमधील सामान्य जनतेला कोणत्याही स्वार्थी राजकारणाचा भाग बनण्याची इच्छा नाही. तेथील मुलांचे भविष्य आता सुरक्षित करायचे आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील चित्र आता बदलले आहे. आता तेथे चित्रपटगृह सुरु झाले आहेत. पर्यटकांची जत्रा भरू लागली आहे. आता तेथे दहशदवादी नाहीत. आता त्या ठिकाणी कोणतीही दगडफेक होत नसून चित्रपटांचे चित्रीकरण अत्यंत व्यवस्थित होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जे लोक केवळ राजकारणासाठी कलम ३७० बद्दल संभ्रम पसरवत आहेत त्यांना स्पष्टपणाने सांगायचे आहे की, आता विश्वातील कोणतीही शक्ती कलम ३७० परत आणू शकत नाही. यापूर्वी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते कि, आमच्या सरकारने कलम ३७० हटवले आहे. आणि आता ते कोणीही परत आणू शकत नाही. आम्ही घेतलेला निर्णय इतिहास लक्षात ठेवेल. ३७० कलमामुळे फुटीरतावादाला चालना मिळाली आणि त्यामुळे दहशतवाद निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या हातात आम्ही लॅपटॉप दिले आहेत.आपण निर्णय घेऊ शकतो. पळून जाऊ शकत नाही. योग्य वेळ आल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील आणि योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल, असे ते म्हणाले.

 

Exit mobile version