ठाकरे सरकारला दणका!! महाराष्ट्रातील ११वीच्या प्रवेश परीक्षा कोर्टाकडून रद्द

ठाकरे सरकारला दणका!! महाराष्ट्रातील ११वीच्या प्रवेश परीक्षा कोर्टाकडून रद्द

११वीच्या प्रवेशासाठी ठाकरे सरकारने घोषित केलेली प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. ही परीक्षा घेण्यासंदर्भात ठाकरे सरकारने गेले काही दिवस तयारी चालविली होती, पण अखेर न्यायालयाने ही परीक्षाच रद्द ठरविली आहे. ही चाचणी घेण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली होती. त्यामुळे यंदा सीईटीची ही परीक्षा होणार नाही. आता ११वीच्या मुलांचे कॉलेज प्रवेश या प्रवेश परीक्षेशिवाय होणार आहेत.

या सीईटी परीक्षेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात गेले काही दिवस प्रकरण सुरू होते. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ११वीतील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्याआधी, महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. या मुलांना मूल्यमापनाआधारे उत्तीर्ण करण्यात आले. पण त्यांच्या ११वीच्या प्रवेशाचा प्रश्न होता. त्यासाठी ही सीईटी ऐच्छिक ठेवण्यात आली होती. त्यामुळे जी मुले परीक्षा देतील त्यांना अपेक्षित कॉलेजप्रवेश मिळणे शक्य होणार होते.

याआधी या प्रवेश परीक्षेबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदविले होते. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर आक्षेप घेतला होता कारण या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमांशी निगडित नसेल. महाराष्ट्र बोर्डाने ही सीईटी एसएससीचा अभ्यासक्रम किंवा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल असे म्हटले होते, त्यामुळे ११वी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

हे ही वाचा:

 

१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

एल्गार परिषदप्रकरणी १५ जणांविरूद्ध आरोपपत्र

१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

काहींचे असे म्हणणे होते की, सीईटी घेण्यात आली तर प्रवेश प्रक्रियेलाच विलंब होऊ शकेल. त्यावर न्यायालयाने अशी विचारणा केली होती की, सीबीएसई, आयसीएससी बोर्डासाठी स्वतंत्र पेपर काढणे शक्य होईल का? पण त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता ही परीक्षाच रद्द केल्यामुळे ११वी प्रवेश हे कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय होतील, हे स्पष्ट झाले आहे.

 

Exit mobile version