पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत

पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणने (MSEDCL) पुणे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शाळांमधील वीजपुरवठा देयक न दिल्यामुळे खंडित केला आहे. पुणे जिल्ह्यातील या शाळांचे तब्बल २.२८ कोटी रुपये थकबाकी आहे. महावितरणाने १२८ शाळांचे वीजबिल न भरल्यामुळे मीटर काढून नेले आहेत.

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे केंद्राकडून अनुदान आले नाही त्यामुळे शाळांचे वीजबिल थकले असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

ऐतिहासिक निर्णय! समलैंगिक सौरभ कृपाल न्यायाधीशपदी

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

पुणे जिल्ह्याच्या अखत्यारीत ३ हजार ६३९ प्राथमिक शाळा असून २ हजार ६८० माध्यमिक शाळा या खासगी आहेत. ‘जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांचे वीज मीटर काढले असून सुमारे ५०० प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आढावा बैठकीत केंद्र सरकारने सर्व शिक्षण अभियान अंतर्गत मागील एक वर्षापासून अनुदान दिले नसल्याचे लक्षात आले. या अनुदानातूनच वीज देयक दिले जाते,’ असेही रणजीत शिवतरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील वीज देयक थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हे देयक भरण्यात येईल असे सांगितले आहे त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version