केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते अमित शहा यांनी शनिवारी सांगितले की, केंद्राने “हलाल-प्रमाणित” उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही.हैदराबादमधील सोमाजीगुडा येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते.
तेलंगणा विधानसभेची निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.भाजपकडून देखील जोरदार प्रचार सुरु आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली.यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर सरकारवर जोरदार हल्ला केला.तसेच देशात हलाल बंदीची मागणी अनेक राज्यांकडून करण्यात येत आहे.मात्र, हलाल बंदीबाबत केंद्राने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, केंद्र सरकारकडून हलालवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.”निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील जनतेला संबोधित करताना म्हणाले की, तुमचे मत खूप महत्वाचे आहे.तुम्ही प्रत्येक पक्षाच्या कामगिरीकडे बघून मतदान करा.कारण तुमचे हे मत केवळ कोणत्याही आमदार किंवा सरकारचे भवितव्य ठरवणार नाहीतर, तुमच्या या मतावर तेलंगणा आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे.
मला विश्वास आहे की, सर्व पक्षांचे विश्लेषण केल्यानंतर तुम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला मत द्याल, असे सोमाजीगुडा येथील पत्रकार परिषदेत अमित शहा म्हणाले.
हे ही वाचा:
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू!
ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!
अमेरिकेत हिंदू धर्मासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारा भारतीय!
ते पुढे म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी जे ४ टक्के आरक्षण दिले आहे ते धार्मिक आरक्षणावर दिले आहे आणि ते म्हणजे हे आरक्षण संविधानाच्या विरोधात आहे.आम्ही हे मुस्लिम आरक्षण संपवू आणि ते एससी, एसटी आणि ओबीसी या वर्गाला देऊ, असे शहा म्हणाले.
सीएम केसीआरवर मोठा हल्ला करताना अमित शाह म्हणाले, ‘केसीआर यांनी मीडियाला सांगितले की, जर मुस्लिम आरोपी जातीय हिंसाचारात अडकला असेल तर त्याचे नाव सांगू नका.त्यामुळे तुम्ही जर ओवेसीला मत दिल्यास ते केसीआरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कारण ओवेसीचे आमदार जिंकले तर हे केसीआरला पाठिंबा देतात.काँग्रेसचेही तसेच आहे.मात्र, भाजपाचे मत फक्त भाजपलाच जाईल कारण भाजप आणि बीआरएस कधीच एकत्र नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले.