24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषअंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला

अंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला

Google News Follow

Related

एकीकडे सर्वसामान्यांना नियमांच्या अधीन राहण्याचे इशारे द्यायचे आणि नियम मोडल्यास कठोर कारवाई करायची पण स्वतः पालिकेच्या अखत्यारितील अंधेरी क्रीडा संकुलात मात्र या नियमांचा पुरता बोजवारा उडवायचा असा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.

अंधेरी क्रीडा संकुलात एका लग्नाच्या निमित्ताने जवळपास ५०० लोक जमा झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामुळे कोरोना नियमावली फक्त सर्वसामान्यांनाच का असा सवाल उपस्थित झाला. या लग्नसोहळ्यासाठी लोकांची मोठी गर्दी झालेली व्हीडिओत दिसते. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सोशल डिसन्टन्सिंग नाही, असे चित्र होते. कोरोनाच्या नव्या व्हेरियन्टचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर लग्नांसाठी ५० लोकांनाच सहभागाची परवानगी देण्यात आली आहे. पण इथे या लग्नसोहळ्याला पाचपट लोक एकत्र आल्याचे दिसते आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्यावर कोणती कारवाई होणार, असा सवाल लोकांकडून विचारला जात आहे.

यासंदर्भातील ट्विट एका जागरुक नागरिकाने केले आहे आणि महाराष्ट्रा मुख्यमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबई महानगरपालिका, मुंबईचे महापौर, इक्बालसिंह चहल व मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.

गर्दी रोखा नाहीतर लॉकडाउन लावण्यात येईल, असे इशारे गेल्या काही दिवसांत जवळपास सर्वच नेत्यांनी दिले आहेत. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत. आता या लग्नसोहळ्यात मोडण्यात आलेल्या नियमांबद्दल ही मंडळी कोणती कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या मदतीने किल्ले लोहगडावर उरुसाचा डाव

शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

कशी विश्वनाथ धाम येथील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ खास भेट

 

ही नवी कोरोना नियमावली जाहीर करण्यापूर्वीही अनेक नेत्यांच्या लग्नसोहळ्यांना कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. अनेक नेते स्वतःच मास्क न घालताच लग्नसोहळ्यांत सहभागी झालेले दिसत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा