लग्न समारंभ आणि संबंधित सणांमध्ये बॉलिवूड गाणी वाजवल्यास कॉपीराइट उल्लंघनावर कारवाई केली जाणार नाही, असे निर्देश केंद्र सरकारने जारी केले आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीने या संदर्भात विनंती केली होती. अशा सोहळ्यांमध्ये कॉपीराइट केलेले संगीत वाजवणे कॉपीराइट कायद्याच्या मर्यादेत येत असले तरी कॉपीराइट कंपन्यांकडून अनेकदा गाण्यांसाठी परवाना शुल्क आकारले जाते. त्यामुळे अनावश्यक वाद उद्भवतात आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर आर्थिक भार होतो. कार्यक्रमाचे आयोजक, हॉटेल व्यवस्थापक आणि उत्सव आयोजित करणार्या व्यक्ती या मुद्द्यावरून अनेकदा कायदेशीरदृष्ट्या अडकले आहेत, असे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उद्योजकांनी केंद्र सरकारला सांगितले होते.
केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) २५४ जुलै रोजी जाहीर सूचनेद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांना या संदर्भात सार्वजनिक आणि भागधारकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
हे ही वाचा:
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी
अनामत रक्कम, अग्निसुरक्षा शुल्क भरणार नाही! गणेशोत्सव मंडळांची भूमिका
मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…
उद्धव ठाकरेंना अजूनही प्रश्न; हिंदुत्व सोडलं म्हणजे काय?
कॉपीराइट कायदा-१९५७ मधील कलम (५२) (१) झेडनुसार, केंद्र/राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाद्वारे धार्मिक किंवा अधिकृत समारंभात साहित्यविषयक कार्यक्रम घेणे, एखादे नाटक किंवा सांगीतिक कार्यक्रम घेणे यांचा समावेश केंद्र सरकार अथवा राज्य सरकार किंवा कोणत्याही प्राधिकरणाने कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाच्या बाबीमध्ये केलेला नाही. यामध्ये विवाह मिरवणूक आणि इतर सामाजिक उत्सवांचाही समावेश आहे.
या कलमाखाली हे कार्यक्रमही धार्मिक समारंभ मानले जातात.कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी कॉपीराइट संस्थांना या कलमाच्या विरोधात जाणाऱ्या कृती टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे डीपीआयआयटीने आपल्या नोटिशीमध्ये नमूद केले आहे.