पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाची सुई असलेले राज्याचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची क्लिन चीट दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी खुलासा केला आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांची चर्चा केल्यानंतरच वाघ यांनी पत्रकार परिषद घेत हे वास्तव मांडले आहे.
शुक्रवार, १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक माध्यमांमध्ये संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिल्याचे वृत्त झळकले होते. पण भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वृत्तांचे खंडन करत राठोड यांना कोणतीही क्लीन चीट दिली नसल्याचे सांगितले. वाघ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी फोनवरून या विषयात चर्चा केली. त्यावेळी गुप्ता यांनी अशा प्रकारची कोणतीही क्लीन चीट दिली नसल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट
भाईचा बड्डे…पोलीस स्टेशनमध्ये साजरा
“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”
राज्याचे ऍडिशनल डायरेक्टर जनरल (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही या संबंधी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितली. त्यामुळे संजय राठोड यांना कोणत्याही पद्धतीची क्लीन चीट मिळाल्याचे सांगितले आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राठोडवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा डाकघळ करण्यात यावा ही आपली मागणी पुन्हा लावून धरली आहे.
भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांची पत्रकार परिषद – माजी वनमंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याच्या माध्यमांतील बातम्यांबाबत @ChitraKWagh pic.twitter.com/9ztN1jBp51
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 16, 2021
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येशी जोडले गेले आहे. राठोड आणि पूजा यांच्यातील संभाषणाच्या क्लीप्सही समोर आल्या होत्या. विरोधकांनीही हा विषय चांगलाच लावून धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राठोड यांचा राजीनामा घेणे भाग पडले होते.