चिनी लि निंगला ठेंगा; ऑलिम्पिकपटूंच्या पोशाखावर फक्त ‘इंडिया’

चिनी लि निंगला ठेंगा; ऑलिम्पिकपटूंच्या पोशाखावर फक्त ‘इंडिया’

Tokyo Olympics 2020. (File Photo: IANS)

येत्या काही महिन्यांमध्ये टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होईल. अवघ्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी आता यासाठी शिल्लक राहिलेला आहे. असे असताना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आयओएने नुकतेच जाहीर केले की, चीनच्या स्पोर्ट्स ब्रँड ली निंग या वस्त्र प्रावरणासोबतचा करार आता रद्द केलेला आहे. आयओ अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांनी ही माहीती दिली. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी ट्विट करून, यापुढे भारतीय अथलीट्स, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारीही टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतेही ब्रँडेड वस्त्र परिधान करणार नाहीत. या अ‍ॅथलीट्सच्या किटवर केवळ ‘इंडिया’ असेच लिहिले जाईल, असे जाहीर केले.

गेल्याच आठवड्यात ऑलिम्पिक किटचे अनावरण झाले. परंतु त्यानंतर माध्यमांकडून मात्र यावर खूप टीका झाल्यावरच यावर योग्य असा निर्णय घेण्यात आल्याचे बात्रा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान विल्यम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोस्ट कॅपिटो रॉबर्ट्स यांची जागा कॅपिटोने विल्यम्स एफ १ संघाचे मुख्याध्यापक म्हणून घेतलेली आहे.

हे ही वाचा:

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला हरविण्याचा पाकचा ‘डाव’

मालाडच्या मालवणीत बिल्डींग कोसळून ११ जणांचा मृत्यू

सध्या आमच्याकडून घेण्यात आलेला निर्णय हा जनभावना ओळखूनच घेतलेला असल्याची कबुली यावेळी मेहता यांनी दिली. अधिक बोलताना ते म्हणाले, “नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आमच्याकडे मात्र याकरता हातात वेळ फारच कमी आहे. मेहता म्हणाले की, “ली निंगबरोबर करार रद्द करून आमचे जवळपास ५ ते ६ कोटींचे नुकसान झालेले आहे. नवीन प्रायोजक मिळाल्यास लवकरच झालेल्या नुकसानीची भरपाई होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आयओएने भारतातील ली निंग उत्पादनांचे विशेष वितरक सनलाईट स्पोर्ट्सशी सुद्धा त्यांचे संबंध तोडले आहेत. गतवर्षी झालेल्या भारत चीन सीमा वादानंतर चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे देशभरात आवाहन केले जात आहे. इंडियन प्रीमियर लीगने २०२० करता विवो या चिनी कंपनीबरोबरचे प्रायोजकत्व रद्द केले होते. भारताने उचललेल्या या पावलामुळे चीनने मात्र नाराजी प्रकट केली आहे.

Exit mobile version