औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज (८ मे) मुंबई हायकोर्टाने निकाल दिला आहे.राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला योग्य असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते.मात्र राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय आज जाहीर केला.राज्य सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आले होते.राज्य सरकारच्या विरोधात अनेकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.मात्र, न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरीफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका आज फेटाळून लावल्या आणि नामकरण करण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे म्हटले. या याचिका फेटाळताना हायकोर्टाने कोणताही आर्थिक दंड लावू इच्छित नाही, असे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे हे आमच्या विचारांचेच आहेत!
ऍस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून करोना लस मागे घेणार!
मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!
हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, महिनाभर सुनावणी झाल्यानंतर कोर्ट आमच्या बाजूने निकाल लावेल अशी अपेक्षा होता. मात्र, आज हायकोर्टाने दिलेला निकाल आम्हाला अपेक्षीत नव्हता.मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.