निवडून येण्याचे आव्हान वाटत नाही, पाय जमिनीवरच, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित!

भाजपा आमदार अतुल भातखळकरांचे वक्तव्य

निवडून येण्याचे आव्हान वाटत नाही, पाय जमिनीवरच, लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित!

कांदिवली पूर्व मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने अतुल भातखळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पक्षाचे विश्वासू आणि जनतेमध्ये लोकप्रिय नेते म्हणून अतुल भातखळकरांची ओळख आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकरांच्या सभा, रॅली पार पडत आहेत, यासह विविध प्रसार माध्यमे त्यांच्या मुलाखती घेत आहेत. अशाच एका मुलाखतीत अतुल भातखळकर यांनी आपल्या विजयाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. निवडून येण्याचे आव्हान वाटत नसून माझे पाय जमिनीवरच आहेत आणि लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. आज १२ नोव्हेंबर रोजी मुंबई तक या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कांदिवली पूर्व मतदार संघातून कांग्रेसने कालू बुधेलिया यांना उमेदवारी दिल्याने तुम्हाला आव्हान वाटते का?, असा प्रश्न अतुल भातखळकर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना भातखळकर म्हणाले, आमचा प्रचार जोरात चालू आहे. उमेदवारीचा अर्ज दाखल करतानाच दीड ते दोन किलोमीटर लांब अशी रॅली होती. मतदारसंघातील सर्व लोक रॅलीमध्ये सहभागी होते.

ते पुढे म्हणाले, १० वर्षे जनतेमध्ये राहून सातत्याने मी काम केले आहे. अतुल भातखळकर हा आपल्या हक्काचा आमदार आहे, अशी लोकांची भावना आहे. लोक मला फोन करत असतात, १० वर्षे झाली तरी मी माझा फोन उचलतो, कोणतीही सुरक्षा नाही, त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण आहे.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी मविआचाही प्रचार करावा!

उद्धव ठाकरेंची बॅग पुन्हा तपासली

बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

अतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री!

सकाळी आमची पदयात्रा आणि संध्याकाळी प्रचार रथ तयार केला आहे, यावरून दोन-तीन तास रॅली चालतात. यावेळी चाळीतील, सोसायटीमधून लोक बाहेर येवून स्वागत करतात. त्यामुळे निवडून येणे हे काय मला आव्हान असे काही वाटत नाही, माझे पाय जमिनीवर आहेत, मी नम्रपणाने सांगतो. पण लोकांचा जो काही प्रतिसाद आहे तो लक्षात घेता, यावेळी प्रचंड बहुमताने मी निवडणूक येईन याची मला खात्री आहे.

पहिला टर्मला बेचाळीस हजाराचा लीड होता, दुसऱ्या लीडला (२०१९) साधारणता त्रेपन्न हजाराचा झाला. पियुष गोयल जेव्हा लोकसभेला जिंकले तेव्हा माझ्या विधानसभेतून त्यांना जवळ-जवळ सत्तर हजारांची लीड मिळाली होती. त्यामुळे १०० टक्के माझा विजय होईल हे निश्चित, असे अतुल भातखळकर म्हणाले.

Exit mobile version