…हा निर्णय न्हावा शेवा सागरी पुलावरून समुद्र दिसावा म्हणून!

…हा निर्णय न्हावा शेवा सागरी पुलावरून समुद्र दिसावा म्हणून!

मुंबईतील दळणवळणासाठी शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाकडे आता मुंबईकरांची नजर लागलेली आहे. या सागरी सेतू प्रकल्पामध्ये पूलाच्या दुतर्फा आता भिंतीऐवजी कठडे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळेच आता एमएमआरडीएने सागरीसेतूच्या दुतर्फा २१.८ कि.मी. भिंत बांधण्याचा निर्णय आता रद्द केलेला आहे. या भिंतीच्या जागी आता कठडा बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  सागरी मार्गावरून प्रवास करताना समुद्राचे दर्शन घडावे म्हणून केवळ दुतर्फा कठडे (रेलिंग) बांधण्यात येणार आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई अंतर वेगात म्हणजे केवळ २५ मिनिटांत पार या पुलामुळे पडणार आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. सुमारे १७ हजार ८४३ कोटी रुपये या प्रकल्पाचा खर्च आहे. येत्या २०२२ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

हे ही वाचा:

कांदे भुजबळ वाद गेला उच्च न्यायालयात

गुलाब चक्रीवादळामुळे झाली ३५ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त

तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे

आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार

एकूण शिवडी ते चिरले पुलाची लांबी २१.८ किमी व पुलावर सहा मार्गिका असतील. हे दक्षिण मुंबईतील स्थानांना पूर्वेकडे नवी मुंबईला जोडण्याविषयीचे काम १९९० पासूनच तत्कालीन राज्य सरकारच्या विचारात होते. या कामाकरिता ८५ टक्के निधी ‘जिका’ या जपानी कंपनी’ने पुरवण्याचे ठरविले आहे. एकूण प्रकल्पाची स्थूल किंमत १७,८४३ कोटी रु. आहे. जुलै २०२१ पर्यंत पुलाचे बांधकाम ४७ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची एकूण लांबी २१.८ किमी, ज्यात पुलाची लांबी १८.१९ किमी व रुंदी २७ मी. मार्गिका (३+३), रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक-एक आपत्कालीन मार्गिका असेल. सर्वात उंच खांब २६ मी. व समुद्रात सर्वात खोल पाया ४७ मी. आहे.

Exit mobile version