नियुक्तीपत्राऐवजी भरती रद्द झाल्याचे पत्र आले

नियुक्तीपत्राऐवजी भरती रद्द झाल्याचे पत्र आले

ठाकरे सरकारचा सीईटी घेण्याचा घोळ कायम असताना आणि अजूनही राज्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच असताना राज्य सरकारने सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी परीक्षा दिलेल्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर या पदांसाठी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भरती प्रक्रियाच रद्द केल्याचे पत्र त्यांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाकरे सरकारने विश्वासघात केला असल्याचे आता परीक्षार्थींकडून म्हटले जात आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या झाल्यानंतरही एमपीएससीच्या बाबतीमध्ये ठाकरे सरकारकडून कुठलीच ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे आता हे परीक्षार्थी सुद्धा आता आत्महत्या हाच मार्ग आहे का असा सवाल विचारू लागले आहेत.

हे ही वाचा:

महापालिकेत अर्थसंकट आणि उधळपट्टीही

सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावालांनी मिश्र लसींबाबत केले मोठे विधान

ठाणे जिल्हयातील पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील घेणार जनतेचा आशीर्वाद

टोकियोत ‘नेम’ का चुकला?

‘महापोर्टल’तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्या तीन याद्या प्रसिद्ध होऊनही भरती झालीच नाही. त्यामुळेच उमेदवारही चांगलेच नाराज झाले आहेत. तिसरी यादी गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान प्रसिद्ध झाली. त्यानंतर काही कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. टाळेबंदीमुळे ही कागदपत्रे पडताळणी झालीच नाही. त्यानंतर नियुक्त्याही झाल्याच नाहीत. परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने आता भरती प्रक्रियाच संपुष्टात आली आहे. भरती प्रक्रीया संपुष्टात आल्याचे उमेदवारांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या ठाकरे सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे १३२ उमेदवार नोकरीपासून वंचित झालेले आहेत.

Exit mobile version