जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. ‘जाहिरातींच्या प्रदर्शनाने गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी’ असा आदेश सरकारच्या नियमावली केलेला आहे. नियमात स्पष्टता नसल्यामुळे मंडळांचा गोंधळ उडाला आहे. गेल्या वर्षी जाहिरातींना ऐन वेळी मज्जाव करण्यात आला होता त्यामुळे यावर्षी सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मंडळांकडून होऊ लागली आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना नियमावली लागू करण्यात आली होती. त्यानुसार मंडळांनी जाहिराती स्वीकारल्या आणि ऐन वेळी पालिकेने जाहिरातींच्या प्रदर्शनाला बंदी घातली. जाहिरात पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि त्यातून कोरोनाची रुग्णसंख्या संसर्गाने वाढू शकते अशी भूमिका पालिकेने घेतली होती. त्यामुळे यावर्षी पालिकेने आपली भूमिका आधीच मांडावी, असे मंडळांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे वर्गणी आणि देणगीवर बंधने आली होती. सध्या उत्सवासाठी पुरेसा निधी नसल्याने अनेक मंडळांती कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून खर्च करून उत्सव साजरा करत आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून मंडळांना आर्थिक मदत होऊ शकते. त्यामुळे पालिकेने जाहिराती प्रदर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

हे ही वाचा:
नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

शेवट ‘गोल्ड’ झाला

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त

देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

गेली दोन वर्षे मंडळांना वर्गणी गोळा करता आलेली नाही. त्यामुळे मंडळे आर्थिक अडचणीत आहेत. राज्य सरकारने आणि पालिकेने व्यावसायिक जाहिराती घेण्यास स्पष्ट परवानगी द्यावी अशी बाजू बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी मांडली.

Exit mobile version