इंडिगोच्या विमानात झाला एसीचा इश्यू; घाम पुसण्यासाठी वापरावे लागले टिश्यू!

फ्लाइटमधील प्रवाशांची ती ९० मिनिटे भयानक, काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमरिंदर सिंग

इंडिगोच्या विमानात झाला एसीचा इश्यू; घाम पुसण्यासाठी वापरावे लागले टिश्यू!

चंदीगड ते जयपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानाने एसी शिवाय उड्डाण केले आणि प्रवाशांना घाम पुसण्यासाठी टिश्यूज देण्यात आल्याची अजब घटना घडली.पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी शनिवारी या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली.तसेच या संदर्भात एअरलाइनवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनहि त्यांनी केले आहे.

पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी शनिवारी “इंडिगो विमान ६E७२६१ मधून चंदीगड ते जयपूर प्रवास करतानाचा आपला अनुभव” शेअर केला. फ्लाइटमधील प्रवाशांसाठी ही ९० मिनिटे भयानक होती कारण त्यांना एअर कंडिशनिंगशिवाय विमानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.त्याबद्दल तक्रार करताना काँग्रेस नेत्याने सांगितले की, प्रथम प्रवाशांना कडक उन्हात सुमारे १०-१५ मिनिटे रांगेत उभे राहण्यास भाग पाडले गेले आणि नंतर एसी सुरू न करता विमानाने उड्डाण केले.

“टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत, एसी बंद होते आणि संपूर्ण प्रवासात सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. फ्लाइट दरम्यान कोणीही गंभीर चिंतेकडे लक्ष दिले नाही. खरं तर, एअर होस्टेसने प्रवाशांना घाम पुसण्यासाठी ‘उदारतेने’ टिश्यू पेपरचे वाटप केले,” असे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

…जेव्हा पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण मुख्यमंत्री योगींच्या मोठ्या बहिणीला भेटते!

भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला

ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये टिश्यू आणि पेपरच्या सहाय्याने हवा घालताना प्रवासी व्हीडिओत दिसत आहेत.काँग्रेस नेत्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांना टॅग केले आणि त्यांना एअरलाइनवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केलेआहे.इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही एका दिवसातील तिसरी घटना आहे.

या अगोदर दिल्लीला जाणार्‍या इंडिगो विमानाचे एक इंजिन खराब झाल्याने शुक्रवारी पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत ही घटना घडली होती.त्यानंतरपाटणा येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर सकाळी ९.११ च्या सुमारास विमान सुरक्षितपणे उतरले.

दुसर्‍या घटनेत, रांचीला जाणारे इंडिगो विमान तांत्रिक बिघाडामुळे टेक ऑफ केल्यानंतर तासाभरात दिल्ली विमानतळावर परतले. फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, इंडिगो फ्लाइटच्या पायलटने विमानातील तांत्रिक बिघाडाझाल्याने विमान IGI विमानतळावर परतत असल्याची घोषणा मध्यभागी असताना केली.

Exit mobile version