बारावी परीक्षेवरून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

बारावी परीक्षेवरून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

राज्य सरकारने अजूनही दहावीच्या परीक्षा घ्याव्यात असा सूर एकीकडे सुरु असताना आता बारावीच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे अनेक विद्यार्थांसह पालकांचा जीवही टांगणीला लागलेला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असता, आता बारावीच्या विद्यार्थांच्या परीक्षा नको असे राज्य सरकार म्हणत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या या निर्णयावर मात्र अनेक महाविद्यालयांचे मुख्याध्यापक नाराज आहेत. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात एकसारखेपणा नसेल तर भविष्यात शिक्षण घेण्यासाठी अडचणी येऊ शकतील.

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी सांगितले की, बहुतेक अन्य राज्ये परीक्षेच्या बाजूने असली तरी परीक्षा नसलेल्या मार्गाची तपासणी करणे आवश्यक आहे. मुंबईच्या एका मुख्याध्यापकांनी सांगितले की, इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही तर अनेक अडचणी येऊ शकतील. विशेषत: अंतिम सत्रात परीक्षा न घेता इयत्ता अकरावीमधून उत्तीर्ण करण्यात आले होते. परंतु उच्चशिक्षण घेताना मात्र केवळ पदोन्नतीचा मार्ग अवलंबणे चुकीचेच आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दिलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी काढणे महाविद्यालयांना अवघड जाईल असेही प्राचार्य म्हणाले. या विषयावर बोलताना एक मुख्याध्यापक म्हणाले की, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे बोर्ड आणि त्याचे गुण महत्त्वाचे आहेत. “आम्ही परीक्षा घेण्यातील अडचणी समजू शकतो. पण यावर मार्ग काढणेही गरजेचे आहे. परीक्षा न घेणे हा यावर मार्ग नाही.

हे ही वाचा:

सप्टेंबरमध्ये परतणार आयपीएलचे धुमशान

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

ठाकरे सरकारचा तुघलकी निर्णय, १३०० कंत्राटी डॉक्टरांना केले सेवामुक्त

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला

‘’प्राचार्य म्हणाले, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळविण्यासाठी बारावीचे गुण महत्त्वाचे मानले जातात. म्हणजेच बारावीच्या गुणांवरूनच पुढे काय शिक्षण घ्यावे हे ठरते.

या एकूणच परीक्षा न घेण्याबद्दल पालक प्रतिनिधी सुधा शेणॉय म्हणाल्या की, जेईई / एनईईटी इच्छुक त्यांच्या अंतर्गत महाविद्यालयीन परीक्षा कधीच गांभीर्याने घेत नाहीत. अनेकांच्या मते पारंपारिक पद्धतीने बोर्ड परीक्षा आयोजित करणे कठीण आहे. सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण केल्याशिवाय शक्य नाही. जुलैमध्ये परिस्थिती सुधारल्यास ते कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय प्रवेश परीक्षा घेऊ शकतात,” असेही प्राचार्य म्हणाले.

केळकर-वझे यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विद्याधर जोशी म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय समान धोरण असले पाहिजे. जेणेकरून एकच नियम सर्वांना लागू पडेल.

पारंपरिक बीए, बी कॉम, बी एससीसाठी अंतर्गत मूल्यमापन एकवेळ ठीक असू शकते. अधिक बोलताना ते म्हणाले, जेव्हा बारावीच्या गुणांची आवश्यकता भासेल त्यावेळी बोर्ड परीक्षा घेण्याची अनुमती देण्यात यावी. अर्थात परिस्थिती सुधारल्याशिवाय या परीक्षा घेणे कठीणच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Exit mobile version