नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

कसे आहे जागेचे समीकरण

नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही.भाजपने २४० जागेवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु बहुमतापासून ३२ जागा दूर आहे.त्यामुळे निकाल आपल्यापासून सस्पेन्स निर्माण झाला असून सरकार स्थापनेबाबत रस्सीखेच सुरु आहे.इंडी आघाडीचे तेजस्वी यादव आणि पवन खेडा यांसारखे नेते म्हणतात की, भाजपाला बहुमत मिळालेले नाही आणि आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ.काँग्रेस गेल्या १० वर्षांपासून सरकार स्थापनेपासून बाहेर आहे आणि त्यांना कसेतरी सरकारचा भाग बनून भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे आहे.

दरम्यान, सर्वांच्या नजरा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे लागल्या आहेत.कारण की नितीश कुमार याआधीही अनेकदा इकडे-तिकडे फिरले आहेत.बुधवारी(५ जून) सकाळी पाटण्याहून दिल्लीला आलेल्या विस्तारा फ्लाइटमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पुढच्या आणि मागच्या सीटवर दिसले तेव्हा अटकळांचा फेरा आणखी वाढला.सर्वांच्या नजर नितीश कुमार यांच्यावर आहेत कारण की, जर नितीश कुमार एनडीए सोडून इंडी आघाडीमध्ये गेल्यास मोदी सरकारचे काय होईल.नितीश कुमार १२ जागा मिळवून एनडीएचा एक महत्वाचा भाग बनले आहेत, परंतु ते उलटले तरी इंडी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी २७२ चा आकडा गाठू शकणार नाही.

हे ही वाचा:

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

बीआरएसची पराभवाची मालिका सुरूच!

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील अंदाज चुकले

आता एनडीएला झालेल्या नुकसानीबद्दल बोलायचे झाले तर नितीश यांच्या जाण्याने निश्चितच धक्का बसेल, पण इतर अनेक पक्षांच्या मतदीने भाजप सत्तेत येऊ शकते.भाजपला २४० तर चंद्राबाबू नायडूंना १६ जागा मिळाल्या आहेत.जर याची बेरीज केली तर २५६ होते. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार आहेत.हे सर्व मिळून २६३ होतात.यानंतर स्वतःला मोदींचे हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्याकडे ५ खासदार आहेत.यासह आकडा २६८ होतो.आंध्र जनसेनेला २ तर जयंत चौधरी यांच्या आरएलडीकडेही दोन जागा आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपना दल यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहे.या जागांसह ही संख्या २७४ होईल.त्यामुळे सरकार स्थापनेचा हा आकडा दोन संख्येने अधिक आहे.या पक्षांव्यतिरिक्त पंजाबमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही एका जागेवर विजय मिळविला आहे. भाजपने प्रयत्न केल्यास पाठिंबा मिळू शकतो.जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम आणि आसाममधील भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषदेनेही एक जागा जिंकली आहे.या सर्वानी साथ दिली तर एनडीए एकूण २७७ जागांसह सहज सरकार स्थापन करू शकते.

 

Exit mobile version