बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष होतील अशी शक्यता वर्तवली जात होती ती अखेर खरी ठरली आहे.दिल्लीतील जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लल्लन सिंह यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि नितीश कुमार याना पक्षाची सूत्रे हाती घेण्याची विनंती केली आणि नितीश कुमार यांनी ही विनंती मान्य केली.
नितीश कुमार यापूर्वी २०१६ ते २०२० पर्यंत जेडीयूचे अध्यक्ष राहिले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगत हे पद सोडत असल्याचे लल्लन सिंह यांनी सांगितले.बैठकीला जाण्यापूर्वी लल्लन सिंह नितीश कुमार याना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते, तिथे दोघांची बैठक अर्धा तास चालली.अखेर नितीश कुमार जेडीयूचे अध्यक्ष झाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!
अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!
आगामी काळात इस्रो ५० उपग्रह अवकाशात सोडणार
२०१६ मध्ये शरद यादव यांच्या जागी नितीश कुमार पक्षाचे अध्यक्ष झाले.२०२० मध्ये त्यांनी पद सोडले आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग यांनी अध्यक्षपदाची जाग घेतली.आरसीपी सिंह यांच्या बंडानंतर लल्लन सिंह याना २०२२ मध्ये जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले.जेडीयूचे बिहार प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने नितीश याना पक्ष आणि देशाच्या व्यापक हितासाठी पक्षाची धुरा सांभाळण्याची विनंती केली होती, जी त्यांनी स्वीकारली.
लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यावर अर्थमंत्री विजय चौधरी म्हणाले की, लल्लन सिंह यांनी स्वतः सांगितले होते की, निवडणुकीच्या कामासाठी सतत बाहेर राहावे लागते.त्यामुळे नितीश कुमार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावी लागली.दोघांमध्ये काहीच वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. याआधी लल्लन सिंह यांच्या राजीनाम्याची शक्यता होती.पण खुद्द लल्लन सिंह यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते.