32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेष'महाभारत'चे नितीश भारद्वाज यांचा पत्नीकडून मानसिक छळ!

‘महाभारत’चे नितीश भारद्वाज यांचा पत्नीकडून मानसिक छळ!

तक्रार दाखल, पोलिसांकडून कायदेशीर मदतीची मागणी

Google News Follow

Related

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भारद्वाज सध्या चर्चेत आहेत.नितीश भारद्वाज यांनी त्यांची पत्नी स्मिता गाते यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.या संदर्भात त्यांनी भोपाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मिळविलेल्या माहितीनुसार, नितीश भारद्वाज यांनी १४ फेब्रुवारी रोजी भोपाळच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. यामध्ये त्यांनी आपली पत्नी स्मिता आपला मानसिक छळ करत असल्याचे नमूद केले होते.तसेच पत्नी आपल्या दोन्ही जुळ्या मुलींनाही भेटू देत नाही.

हे ही वाचा:

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका

इम्रान खानच्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर

तक्रारीनुसार नितीश सांगतात की, स्मिता मुलींना त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या शाळा बदलत राहते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती नितीश यांनी पोलिसांना केली आहे.पोलिसांनी नितीश यांची तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता या आयएएस अधिकारी आहेत. नितीशचे स्मितासोबतचे हे दुसरे लग्न आहे. २७ डिसेंबर १९९१ रोजी त्यांनी मोनिषा पाटील यांच्याशी विवाह केला होता. २००५मध्ये नितीश आणि मोनिशा यांचा घटस्फोट झाला. यानंतर नितीश यांनी २००९ मध्ये स्मिताशी लग्न केले. या दोघांना देवयानी आणि शिवरंजनी या जुळ्या मुली झाल्या. पण लग्नाच्या १० वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. २०१८ मध्ये स्मिता आणि नितीश यांनी परस्पर संमतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा