29 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरविशेषसिलीगुडीत नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली

सिलीगुडीत नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली

Google News Follow

Related

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. सिलीगुडीतील रस्ता उद्घाटन कार्यक्रमात स्टेजजवळील एका खोलीत चहा पीत असताना अचानक अस्वस्थ झाल्याची तक्रार केली. ओटिया हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर पीबी भुतिया यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक नितीन गडकरी यांच्यावर उपचार करत आहे. त्यांनतर त्यांना थोडे बरे वाटत असल्याचे बोलले जात आहे.

नितीन गडकरी सिलिगुडी येथे १३ किमी चार-लेन एलिव्हेटेड रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. नितीन गडकरी यांच्याहस्ते सिलीगुडीमध्ये १,२०६ कोटी रुपये खर्चाच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली . या कार्यक्रमानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर सुकना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पोहोचून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. रक्तातील साखर अचानक कमी झाल्याने गडकरी यांची तब्येत बिघडली असे एका भाजप नेत्याने सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीन गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्यांनी सीपी सिलीगुडी यांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यास सांगितले. नितीन गडकरी लवकरच बरे होतील अशी आशा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

अशा कार्यक्रमादरम्यान गडकरींची प्रकृती खालावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये अहमदनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गडकरी यांची प्रकृती खालावली होती. गडकरी मंचावरच बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा