केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेत सध्याची टोल व्यवस्था रद्द केली आहे. यासोबतच सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकार टोल रद्द करत असून लवकरच उपग्रहावर आधारित टोलवसुली यंत्रणा सुरू केली जाणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. टोलवसुली वाढवणे आणि टोलनाक्यांवरील गर्दी कमी करणे हा या प्रणालीच्या अंमलबजावणीमागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभेत लेखी उत्तर देताना मंत्री गडकरी यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम’ (GNSS) लागू करणार आहे. सध्या हे फक्त निवडक टोलनाक्यांवरच होईल. तत्पूर्वी, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते, “आता आम्ही टोल रद्द करत आहोत आणि उपग्रहावर आधारित टोल वसूल करणारी यंत्रणा असेल. तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि तुमच्या अंतरानुसार शुल्क आकारले जाईल, असे मंत्री गडगरींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. पूर्वी मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी ९ तास लागायचे, आता ते २ तासांवर आले आहे.
हे ही वाचा:
म्यानमारमध्ये गृहयुद्ध; चीन सीमेला लागून असलेल्या लॅशियो शहरावर बंडखोरांकडून कब्जा
पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश
पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!
दरम्यान, यापूर्वी डिसेंबर महिन्यात मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केली होती की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने मार्च २०२४ पर्यंत ही नवीन प्रणाली लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.