पत्रकार राजदीप सरदेसाई यांना अनेक वेळा तोंडावर आपटण्याची वेळ आली आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांचा पाणउतारा गडकरींनी केला. इंडिया टुडेच्या मुलाखतीत राजदीप यांनी एक प्रश्न ग़डकरी यांना विचारला आणि त्यानंतर गडकरींनी राजदीप यांना त्यांची योग्यता लक्षात आणून दिली. वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्याबाबत लोकसभा निवडणुकीदरम्यान कारस्थान करण्यात आले होते. नागपूरमध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू होत्या.
सरदेसाई यांनी प्रश्न विचारला की, गडकरी यांना पराभूत करण्यासाठी पक्षात कारस्थान केले जात आहे हे खरे आहे का? त्यावर ग़डकरी म्हणाले की, हे पूर्णपणे खोटे आहे. तेव्हा राजदीप म्हणाले की, तुमचे नाव तेव्हा भाजपाच्या पहिल्या यादीतही नव्हते. मग तुम्ही नागपूरला विमानतळावर मोदींची भेट घेतली आणि तो प्रश्न सोडविला.
त्यावर गडकरी हसत म्हणाले की, मी जेव्हा तुम्हाला (राजदीप यांना) पाहतो तेव्हा मला फार कीव येते. जेव्हा पंतप्रधान आमच्या राज्यात येतात तेव्हा एक राजशिष्टाचार म्हणून मी तिथे असतोच. तुम्हाला कुणी ही माहिती दिली? पंतप्रधानांनी तुम्हाला कानात येऊन सांगितले का की, मी त्यांची भेट घेतली आणि मला लोकसभेचे तिकीट केव्हा द्याल अशी विचारणा केली? तुमच्याकडे कोणता पुरावा आहे?
हे ही वाचा:
“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”
अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…
जम्मू- काश्मीर बस हल्ला: राजौरी, रियासी भागात एनआयएकडून छापेमारी सुरू
इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार
त्यानंतर गडकरी म्हणाले की, जबाबदारीने बोला. असे काही नाही. महाराष्ट्राची यादी तेव्हा तयारच नव्हती. महाराष्ट्राच्या संसदीय़ मंडळाने ती यादी तयार करून दिल्लीला पाठवली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीरच झालेली नव्हती. जेव्हा माझे नाव जाहीर झाले तेव्हा सगळ्यांना ते कळलेच.
राजदीप यांनी पुढे असेही विचारले की, तुम्ही नाराज आहात, अशीही कुजबुज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांत तुम्ही सहभागी होण्यास इच्छुक नाहीत, असे बोलले जाते. दिल्लीतच तुमचे मन रमते. त्याचे कारण म्हणजे तुम्हाला कुणीतरी पराभूत करू इच्छित होते. यामागील सत्य काय हे सांगा? तेव्हा गडकरी म्हणाले की, यामागील सत्य हे की, तुम्ही १०१ टक्के खोटे बोलत आहात. हे पहिले सत्य. आता माझे पूर्ण ऐकून घ्या. मी भारतीय जनता पार्टीच्या जम्मू काश्मीरमधील दौऱ्यावर होतो. काल मी हरयाणातही होतो. शिवाय सकाळी मी बेंगळुरूला होतो. त्यामुळे मी नागपूरमध्ये असण्याचा प्रश्न नव्हता. मी राज्याच्या प्रदेशाध्यक्षांनी हे सांगितले होते. प्रदेशाध्यक्षांनीही हे स्पष्ट केले तरीही तुमच्यासारखे वरिष्ठ पत्रकार असा प्रश्न मला कसा काय विचारतात? त्यामुळे तुम्ही जी माहिती सांगितलीत ती पूर्णपणे खोटी आहे आणि मी कशामुळेही नाराज नाही.