नागपुरात नितीन गडकरींनी विजयाचा झेंडा रोवला!

काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव

नागपुरात नितीन गडकरींनी विजयाचा झेंडा रोवला!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विजय झाला आहे.त्यांच्याविरोधात काँग्रेसने शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे याना उभे केले होते.मात्र, या ठिकाणी विकास ठाकरेंना पराभव पत्करावा लागला आहे.

भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते.त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे उभे राहिले होते.पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. पण, २०१४ च्या मोदी लाटेत गडकरी पहिल्यांदा येथून निवडून आले. तर, २०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांनी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार ००९ मतांनी पराभव केला होता.आता देखील विजयाची घोडदौड सुरु ठेवत नितीन गडकरी यांनी विकास ठाकरे यांचा पराभव करत विजय मिळवीला आहे.

हे ही वाचा:

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी, ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचं खातं बुडीत!

नीतिश कुमार एनडीएसोबतच राहणार

मध्यप्रदेशातून शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

हा निकाल परिवर्तनाला पोषक

नागपूरमधून भाजप उमेदवार नितीन गडकरी हेच विजयी होतील असे नागपूरच्या जनतेने घोषित केले होते.आपल्या कामात तत्पर आणि स्वतःची एक वेगळी ओळख असलेले नितीन गडकरींचा लोकसभेत तिसऱ्यांदा विजय झाला आहे.मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच नितीन गडकरी लीड करत होते.अखेर त्यांनी विकास ठाकरेंचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे.नितीन गडकरींच्या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

Exit mobile version