नितीन गडकरींच्या हस्ते हैद्राबादमध्ये १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आणि ७ सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन

नितीन गडकरींच्या हस्ते हैद्राबादमध्ये १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आणि ७ सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कायमच आपल्या कामाच्या धडाक्यासाठी चर्चेत असतात. केंद्रातील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक असणाऱ्या गडकरींनी आज हैद्राबाद येथे अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हैद्राबादमध्ये ८००० कोटी रुपये खर्चाच्या ४६० किलोमीटर लांबीच्या १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे, ७ सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, वेमुला प्रशांत रेड्डी, खासदार, आमदार, आणि मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुंबईकरांची एसी लाईफलाईन झाली स्वस्त

ठाकरे सरकार विरोधात किरीट सोमय्या न्यायालयात

 

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामध्ये ८००० कोटींची गुंतवणूक करून ४६० किलोमीटरचे मार्ग तयार करण्यात आले असून यामुळे तेलंगणा ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत वेगवान प्रवास करणे शक्य होणार असून आंतरराज्य संपर्क व्यवस्था अधिक चांगली होणार आहे. जलदगती महामार्ग विकासामुळे या प्रदेशातल्या व्यापाराला चालना मिळेल तसेच युवकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक आणि सुरक्षित राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार केल्यामुळे हैद्राबाद आणि तेलंगणामधल्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक समृद्धीवर त्याचा मोठा प्रभाव पडेल.

Exit mobile version