गडकरींमुळे महाराष्ट्रातून विकासाचा ‘मार्ग’

गडकरींमुळे महाराष्ट्रातून विकासाचा ‘मार्ग’

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकासकामासाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यांमधील कामांचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतील रस्त्यांची विविध कामे या निधीतून पूर्ण केली जाणार आहेत. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ज्या ७ जिल्ह्यांमधील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केलाय त्यात नाशिक, पुणे, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि लातूरचा समावेश आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या जिल्ह्यांमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील वाहतूक अधिक वेगवान होईल.

हे ही वाचा:

संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींची बदनामी सहन करणार नाही

लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची आर्थिक मदत घ्या, राहुल शेवाळेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

विस्तारा करणार देशातील डॉक्टरांसाठी मोफत उड्डाणे

अल्पप्रतिसादामुळे रेल्वेकडून गाड्या रद्द

याशिवाय वाडा (ता. खेड) ते घोडा (ता. आंबेगाव) रस्ता दुरुस्तीसाठी २.७२ कोटी (ता. आंबेगाव), दौंड (जि. पुणे) ते गर (जि. नगर) भीमा नदीवरील पुलाचे कामासाठी १९.९९ कोटी आणि निमगाव खंडोबा येथे सर्व सुविधांसह एरियल रोप-वे कामासाठी ३१.८१ कोटी मंजूर झाले आहेत.

गडकरींनी मंजूर केलेल्या निधीतून महाराष्ट्राच्या या सात जिल्ह्यांतील रस्ते दुरूस्ती, नव्या रस्त्यांची बांधणी, पुल बांधणी, दुपदरीकरण इत्यादी कामे पूर्ण होणार आहेत. त्याशिवाय विविध कामांमूळे अर्थव्यवस्थेला देखील सहाय्य होऊ शकेल.

Exit mobile version