“आज सकाळची सुरुवात एक दुःखद घटना कानावर पडून झाली. स्वर्गीय लता मंगेशकर यांनी आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावले होते. त्यांनी फक्त मराठीतच नाही तर अनेक भाषांमध्ये गाणे गायली आहेत. जगातील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.” अशा दुःखद शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत आपले दुःख व्यक्त केले.
लता दीदींच्या जाण्याने न भरून निघणारे दुःख झाल्याचे ते म्हणाले. लता दीदींना काल रुग्णालयात दाखल केले तेव्हा नितीन गडकरी त्यांना भेटून आले होते. आज सकाळीही ते रुग्णालयात हजर होते. त्यावेळीच लता मंगेशकर यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली.
देश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2022
अनेक मान्यवरांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘अलौकिक स्वर हरपले’ अशा शब्दात लता दीदींच्या निधनाच्या वृत्तानंतर शॉक व्यक्त केला.
‘मेरी आवाज ही पहचान है. लतादीदींचा आवाज कायम मनात रूंजी घालत राहील’ एका सुवर्ण युगाचा अंत झाला. अशा दुखःद शब्दात मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम
भारताने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरत रचला इतिहास!
तीस हजारहून अधिक सापांना जीवनदान देणारा हा ‘स्नेक मास्टर’ आहे कोण? वाचा सविस्तर
भाजपच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो! अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांचे दुःख व्यक्त केले आहे. लतादीदींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच प्रार्थना! अशा दुःखद शब्दात अमृता फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.