२०२२-२३ मध्ये बांधणार ‘या’ विक्रमी वेगाने महामार्ग

२०२२-२३ मध्ये बांधणार ‘या’ विक्रमी वेगाने महामार्ग

आपल्या कामाच्या विक्रमी वेगासाठी आणि रस्ते विकासासाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवी घोषणा केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये भारतात विक्रमी वेगाने राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्याचे नितीन गडकरी यांनी बोलून दाखवले आहे. या आर्थिक वर्षात रस्ते बांधणीचा वेग प्रति दिन ५० किलोमीटर असेल असे गडकरी यांनी सांगितले. तर या वेगाने १८००० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करणार असल्याचेही ते म्हणाले. ट्विटरच्या माध्यमातून नितीन गडकरींनी ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आमच्या समोर असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किमी अशा विक्रमी वेगाने १८००० किमी राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याचा देशभर विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!

आसाम सरकारचा ‘चौथा स्तंभ’

आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

ट्वीट संदेशात ते म्हणाले की, २०२५ पर्यंत २ लाख किमी पर्यंत राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नितीन गडकरी यांनी जागतिक दर्जाच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा ठरविलेल्या वेळेतच आणि उद्दिष्ट समोर ठेवून बांधण्यात याव्यात यावर भर दिला; कारण रस्ता ही पायाभूत सुविधा असून तो आत्मनिर्भर भारताचा ‘आत्मा’ आहे.

Exit mobile version