दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

वाद निर्माण करणाऱ्यांना दिला इशारा

दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

नवी मुंबईतील तळोजा येथील पंचानंद सोसायटीत दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्याला त्याचं सोसायटीतील मुस्लिमांनी जोरदार विरोध केला होता. सोसायटीतील हिंदू महिलांशी या सोसायटीतील मुस्लिमांनी भांडण केले. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, भाजपा नेते नितेश राणे यांनी शनिवारी तळोजामधील या सोसायटीला भेट दिली. ‘सकाळ’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

तळोजा येथील एका सोसायटीमध्ये दिवाळीनिमित्त दिवे लावण्यावरुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती. अशातच भाजपा नेते नितेश राणे यांनी शनिवारी तळोजा येथील सोसायटीला भेट देऊन हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच नितेश राणेंनी वाद निर्माण करणाऱ्यांना इशाराही दिला आहे. यावेळी नितेश राणे म्हणाले की, “जर या हिरव्या सापांनी अशी वळवळ केली तर पुढची कुठलीही ईद व्यवस्थित साजरी होऊ देणार नाही. नितेश राणेचा हा धमकी वजा इशारा आहे. या देशात ९० टक्के हिंदू राहतात, तुम्हाला कधी पायाखाली चिरडून टाकू कळणार नाही,” अशा शब्दात नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

१८ हिंदुंवर देशद्रोहाचा गुन्हा !

ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेतील हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन

सोसायटीतील हिंदू कुटुंबांनी इमारतीत रोषणाई करण्याचे ठरविले पण सदर मुस्लिमांनी त्यांना रोषणाई करू देण्यास विरोध केला. त्यावरून सदर हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुष यांच्यात जोरदार खटका उडाला. त्यात मुस्लिम पुरुषांनी या महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. विद्युत रोषणाई करून दिलीच जाणार नाही, अशा धमक्याही या मुस्लिम पुरुषांनी दिल्या. पुढे माहिती समोर आली की, या सोसायटीने कोणताही उत्सव सोसायटीच्या आवारात साजरा करायचा नाही, असा निर्णय घेतल्याचे कळते. त्याची सुरुवात मागे झालेल्या बकरी ईदच्या निमित्ताने झाली होती. त्यावेळी या सोसायटीतील काही सदस्यांनी आपल्या घरात बकरा कापण्यासाठी आणला होता. त्याला हिंदू सदस्यांनी विरोध केला. बकरा इथे सोसायटीत कापू नका, असा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यावरून मग सोसायटीच्या आवारात कोणताही उत्सव साजरा करायचा नाही, असे ठरल्याचे सांगण्यात येते.

Exit mobile version