रामदेव बाबा यांच्या ‘मोक्ष कसा मिळेल’ या प्रवचनाला विरोधकांनी ‘बाबांचा मोक्ष उद्योग’ असा अग्रलेख सामना वृत्तपत्रात लिहिला होता. सामना वृत्तपत्राचा इतिहास आणि आजची परिस्थिती ही डबघाईला आल्याने बाबारामदेव यांच्याकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का ? या आशेने त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आजचा अग्रलेख लिहला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
बाबा रामदेव यांनी काशीमध्ये मोक्ष कसा मिळेल याचे प्रवचन दिले होते. सनातन धर्माला जे शिव्या देत आहेत त्यांना २०२४ मध्ये ‘मोक्ष’ मिळेल असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले होते. यावर आजच्या सामना पेपर रामदेव बाबा यांनी ‘बाबांचा मोक्ष उद्योग’ अशा प्रकारचा नवीन उद्योग चालू केल्याचा अग्रलेख लिहिला होता.त्यावर आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले देत म्हणाले, रामदेव बाबा यांच्याकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का या आशेने त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आजचा अग्रलेख लिहला असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
हिप हिप हूपर्स हुर्रे…बास्केटबॉल स्पर्धेचे पटकावले जेतेपद
सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !
कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
९० च्या दशकामधील दाऊद आणि छोटा शकील त्यांची गँग बॉलीवूड अभिनेते, बिल्डर्स नामांकित व्यक्तींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत असे त्याचप्रमाणे आजच्या वेळेला सामना पेपरची परिस्थिती बिकट असल्याने तसेच त्यांना सरकार कडून कोणताही महसूल मिळत नसल्याने रामदेव बाबा यांच्या पतंजली प्रॉडक्टचे काही ऍड, किंवा महसूल मिळेल या आशेने रामदेव बाबा यांचा अग्रलेख लिहून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न हे करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
नितीन देसाई यांच्या मृत्यूला देखील ठाकरे जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. देसाई यांचा स्टुडिओ यांना पाहिजे होता म्हणून ते देसाई यांना धमाकावत असल्याचे राणे यांनी सांगितले.पुढील काळात जर रामदेव बाबा यांच्या पतंजली प्रॉडक्टचे ऍड सामना वृतपत्रात दिसल्यास समजून जावे की, आताच्या स्थितीला रामदेव यांना केलेला हा विरोध फक्त मोबदला मिळावा यासाठी करण्यात आला होता.ठाकरे गट आमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करतात मात्र हे स्वतः घोटाळ्यात बरबटलेले आहेत ते त्यांना दिसत नसल्याचे सांगत विरोधकांना राणेंनी टोलाही लगावला.